देशात शतक गाठणारे पहिले महानगर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात शनिवारी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल शंभरी पार गेले असून देशात शंभरी गाठणारे मुंबई हे पहिले महानगर ठरले आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डिझेलच्या दरामध्ये २८ पैसे आणि पेट्रोल दरात २६ पैसे वाढ केली आहे. मुंबईत १००.१९ रुपये व डिझेल ९२.१७ रुपये प्रतिलीटर झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात दररोज सकाळी ६ वाजता बदल होतो. पेट्रोल, डिझेल दरात एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर खर्च एकत्र करून इंधनदर दुप्पट होतात.
शहर - डिझेल - पेट्रोल (प्रतिलीटर रुपयांमध्ये)
दिल्ली- ८४.८९-९३.९४
मुंबई-९२.१७ -१००.१९
कोलकाता ८७.७४- ९३.९७
चेन्नई ८९.६५-९५.५१
..................................................................