उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे शेकडो विद्यार्थी लसीकरणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:25+5:302021-06-01T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे साेमवारपासून राजावाडी, कस्तुरबा आणि कूपर हॉस्पिटलमध्ये वॉक इनद्वारे सोमवार, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे साेमवारपासून राजावाडी, कस्तुरबा आणि कूपर हॉस्पिटलमध्ये वॉक इनद्वारे सोमवार, मंगळवार व बुधवारी लसीकरण सुरू करण्याचे सुधारित परिपत्रक मुंबई महानगरपालिकेने गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा जारी केले होते. त्यानुसार, साेमवारी सकाळी कूपर हॉस्पिटलमध्ये उच्च शिक्षगासाठी परदेशी जाणारे ५०० विद्यार्थी आले, मात्र लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे फक्त ५० विद्यार्थ्यांना लस मिळाली. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित साटम यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
या प्रकरणाची माहिती देणारा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
त्यामुळे राज्य सरकारच्या काही मंत्री व मुंबई महानगरपालिकेचा आमदार साटम यांनी तीव्र निषेध केला. भाजपतर्फे मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण कॅम्पमधून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार साटम यांनी दिले.