Join us

स्टेशनवर गुंडांचा धुमाकुळ

By admin | Published: December 14, 2014 12:48 AM

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री गुंडांनी धुमाकुळ घातला. 12 ते 15 जणांच्या टोळीने वृद्ध नागरिकासह इतर प्रवाशांना बेदम मारहाण केली.

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री गुंडांनी धुमाकुळ घातला. 12 ते 15 जणांच्या टोळीने वृद्ध नागरिकासह इतर प्रवाशांना बेदम मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी प्रयत्न करणा:यांनाही पटय़ाने मारहाण केली. मात्र याची रेल्वे पोलीसांना माहिती नसल्याने  रेल्वे स्टेशनच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
शुक्रवारी रात्री 9 वाजता स्टेशनच्या पूव्रेकडून पश्चिमेकडे 12 ते 15 युवक जात होते. मद्यधुंद अवस्थेमधील हे तरूण भुयारी मार्गात प्रवाशांना शिवीगाळ करत प्लॅटफॉर्मवर गेले. तीन नंबर प्लॅटफॉर्मवर एक वृद्ध नागरिकाला शिवीगाळ करून त्यांना पटय़ाने मारहाण करण्यास सुरवात केली. इतर प्रवाशांनी आक्षेप घेतला असता त्यांनाही धमकी देण्यात आली. ज्यांनी सोडून द्या, वृद्ध आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या गुंडांनी मारहाण केली. नंतर ही टोळी पुन्हा भुयारी मार्गात आली. तेथेही एक तरूणास बेदम मारहाण केली. सुटका करून घेण्यासाठी तरूण गर्दीमध्ये घुसला असता त्याला पकडले व त्याठिकाणी उपस्थित प्रवाशांनाही मारहाण केली. 
सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये 15 ते 2क् मिनीट हा राडा सुरू होता. दरम्यान या ठिकाणी पोलिस अधिकारी फिरकलेच नाहीत. सिडकोचे सुरक्षा कर्मचारीही येथे आले नाहीत. प्रवाशांनी या ठिकाणी डय़ुटीवर असलेल्या एक पोलिसाला माहिती दिली. परंतु मी वायरलेसवर याची माहिती दिली आहे. जादा पोलिस थोडय़ा वेळेत येतील असे सांगून त्यांनी हात झटकले.(प्रतिनिधी)
 
पोलिस स्टेशनमध्ये नोंदच नाही :  सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये झालेल्या या राडय़ाविषयी माहिती घेण्यासाठी वाशी रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असता या घटनेविषयी कोणतीच नोंद नसल्याचे सांगण्यात आले. याविषयी कोणीही तक्रार केलेली नसल्याचे सांगितले. यामुळे पोलिस सुरक्षेविषयी किती उदासिन आहेत हेच स्पष्ट होत आहे. 
सीसी टिव्ही तपासण्याची मागणी : गुंडांनी केलेल्या राडय़ाविषयी काही दक्ष नागरिकांनी लोकमतला माहिती दिली. रेल्वे स्टेशनमध्ये व भुयारी मार्गात सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमे:यांची पाहणी करून संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.