चक्रीवादळाने इंटरनेटची गती रोखली, केबल सेवेवरही परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:06 AM2021-05-18T04:06:17+5:302021-05-18T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चक्रीवादळाचा तडाखा केबल आणि इंटरनेट सेवेलाही बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चक्रीवादळाचा तडाखा केबल आणि इंटरनेट सेवेलाही बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने इंटरनेटच्या वायर्स तुटल्या, तर मुसळधार पावसामुळे बऱ्याच विभागांत केबल ‘नॉट रिचेबल’ होती.
दक्षिण मुंबईसह उपनगरातील किनारपट्टीलगतच्या भागांत सकाळपासूनच केबल बंद होती, तर मुसळधार पावसामुळे डिश टीव्हीला सिग्नल मिळत नसल्याने सेवा कोलमडली.
इंटरनेटनेही ग्राहकांची निराशा केली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने इंटनेटच्या केबल तुटल्या. एमटीएनएल, बीएसएनएलसह खासगी दूरसंचार कंपन्यांच्या इंटनेट सेवेची गतीही चक्रीवादळाने रोखली. आमचा तांत्रिक विभाग सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे; परंतु वाऱ्याचा जोर आणि मुसळधार पावसामुळे अडचणी येत असल्याचे केबल पुरवठादार रजनीश हिरवे यांनी सांगितले.
इंटरनेटच्या वायर्स तुटल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. विशेषतः दक्षिण मुंबईतून केबल आणि इंटरनेटबाबत तक्रारी येत आहेत. वाऱ्याचा वेग आणि पाऊस थांबल्यानंतर दुरुस्ती काम हाती घेतले जाईल, अशी माहिती शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय पाटील यांनी दिली.
................................................