Join us

चक्रीवादळामुळे ४६ लाख वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:06 AM

ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘तौउते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे राज्यातील ४६ लाख ४१ ...

ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘तौउते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे राज्यातील ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यांतील १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले. ६ हजार ४० गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला. ७ लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला. यामुळे ७ लाख ७३ हजार ७६० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. पालघर जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास २ लाख ४४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

* यांचाही वीजपुरवठा खंडित

जिल्हा - वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक - पुरवठा पूर्ववत करण्यात आलेली ग्राहक संख्या

रत्नागिरी - ५ लाख ४५ हजार १२१ - ४ लाख १८ हजार ३६०

सिंधुदुर्ग - ३ लाख ६६ हजार ११ - ६७ हजार १६६

नाशिक - ३ लाख २९ हजार ३०४ - २ लाख ७२ हजार

कोल्हापूर - २ लाख ९६ हजार ९६५ - २ लाख ४९ हजार ६०१

सातारा - ४ लाख ३६ हजार ७६८ - ४ लाख ८ हजार ८९

पुणे - १ लाख ६६ हजार - १ लाख ४८ हजार ११२

सांगली - १ लाख ५५ हजार ५४३ - १ लाख ५३ हजार ७१५

विदर्भ ५३ हजार ३९२ - ५० हजार

मराठवाडा - १ लाख ५ हजार १४२ - १ लाख ३ हजार ९२४

* पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

विभाग स्तरावर ४६ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने १३ हजार तंत्रज्ञांची फौज मैदानात उतरवली आहे. १५४६ उच्चदाब पोल पडले. ४२५ दुरुस्त झाले. ३९४० लघुदाब पोल पडले. ९७४ दुरुस्त झाले. ९३ हजार ९३५ रोहित्रांमध्ये बिघाड झाला. ६८ हजार ४२६ दुरुस्त करण्यात आले.

.....................................................