Join us

चक्रीवादळ : पावसाचा जोर आजही कायम राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला सोमवारी झोडपून काढणाऱ्या चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे सुरु झाल्यानंतर देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला सोमवारी झोडपून काढणाऱ्या चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे सुरु झाल्यानंतर देखील मंगळवारी मुंबईत हलक्या का होईना पावसाचा मारा असणार आहे. चक्रीवादळानंतरच्या प्रभावामुळे मुंबईसह आसपासच्या परिसरात वारे वाहतील. शिवाय पावसाचेही किंचित वातावरण राहील, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनीही समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, विद्युत तारा व विद्युत पोल पडणे अशा घटना घडलेल्या आहेत. मात्र सदर स्थिती पूर्ववत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.