चक्रीवादळ : कोरोनाचे उपचार करीत असलेल्या ४० रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित; वीजपुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:06 AM2021-05-18T04:06:41+5:302021-05-18T04:06:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसला. ...

Hurricane: Power outages at 40 hospitals treating corona; Power supply on the battlefield | चक्रीवादळ : कोरोनाचे उपचार करीत असलेल्या ४० रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित; वीजपुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर

चक्रीवादळ : कोरोनाचे उपचार करीत असलेल्या ४० रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित; वीजपुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसला. महावितरणच्या भांडूप परिमंडलातील यंत्रणा सज्ज असल्यामुळे यात मोठे नुकसान झाले नाही. मात्र कोरोनाचे उपचार करीत असलेल्या ग्रामीण भागातील ४० रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित झाला असून त्यापैकी ३५ रुग्णालयांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. उर्वरित ५ रुग्णालयांना वीजपुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून रुग्णालयांची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

भांडूप परिमंडलात जोरदार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेण, वाशी व ठाणे मंडळात ६ लाख ७३ हजार ३६९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर रात्रभर काम करून काही तासातच ४ लाख १३ हजार ६८४ ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ववत केला. अवघ्या सहा तासातच ४ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्वपदावर आणण्यात महावितरण यशस्वी झाले. ग्रामीण भागातील एकूण १४७१ पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या असून ८४३ पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, २१ उपकेंद्र, १७२ फीडर, १६७५ गावे, ६०८८ रोहित्र, ९३ उच्चदाब खांब व १७५ लघुदाब खांब प्रभावित झाले असून यातील, १९ उपकेंद्र, १२४ फीडर, ९६५ गावे, ३१५५ पूर्वपदावर करण्यात आले आहे.

-------------------

- ठाणे मंडळातील ६८ हजार ८०४ ग्राहकांचा वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला होता . त्यातील, ६१ हजार ७९९ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

- वाशी मंडळातील १ लाख ४० हजार ७०१ ग्राहकांचा वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला असून ५७ हजार १२८ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

- पेण मंडळातील ४ लाख ६७ हजार ८६४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून २ लाख ९४ हजार ७५७ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

Web Title: Hurricane: Power outages at 40 hospitals treating corona; Power supply on the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.