- मनीषा म्हात्रेमुंबई : लोकल आणि नालासोपारातील विनयभंगाच्या घटना ताज्या असतानाच, वरळीत मध्यरात्री घराकडे परतत असलेल्या २० वर्षांच्या नवविवाहितेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मध्यरात्री तिच्या एकटेपणाचा फायदा घेत, तरुणाने तिला मिठी मारत तिचे चुंबन घेतले. त्यानंतर, तिला रस्त्यावर पाडून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला प्रतिकार करत, एका आडोशाचा आधार घेतला. बराच वेळ बसल्यानंतर पतीचा मित्र तिच्या दृष्टीस पडला. त्याने फोनवरून याबाबत पतीला कळविले आणि त्याच्या मदतीने तिने घर गाठले. तिच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.तक्रारदार नेहा (नावात बदल) वरळी परिसरात कुटुंबीयांसोबत राहते. तिच्या आजीचे नुकतेच डोळ्यांचे आॅपरेशन झाले असल्याने, त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमरास ती आजीला बघायला निघाली. ठरल्याप्रमाणे रात्री दीडच्या सुमारास आजीला भेटून ती रुग्णालयातच पतीची वाट बघत थांबली.मोबाइल नसल्याने तिने तेथीलच एका रुग्णाच्या मोबाइल क्रमांकावरून पतीला फोन केला. मात्र, पती बाहेर असल्याने त्याने नेहाला टॅक्सीने वरळी नाका येथे येण्यास सांगितले. रात्री अडीचच्या सुमारास ती वरळी नाका येथे उतरली. पती दिसला नाही. बराच वेळ थांबल्यानंतर तिने हळूहळू घराच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली.त्याच दरम्यान एका तरुणाने तिला रोखले आणि पतीचा मित्र असल्याची ओळख दाखवून एवढ्या रात्रीची कुठे फिरते, असा सवाल केला आणि पतीच्या मोबाइल क्रमांकावर कॉलही केला. मात्र, त्याने तो फोन घेतला नाही. तिने त्याला काहीही प्रतिसाद न देता घराकडे निघाली. तिला एकटे पाहून त्या तरुणाने तिला पाठीमागून जाऊन मिठी मारली आणि चुंबन घेतले. त्यानंतर, तिला रस्त्यावर पाडून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.‘तो’ विकृत तरुण पतीचाच मित्रपती घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्याला सांगितला. तिने पतीच्या क्रमांकावर आलेला मिस कॉल तपासण्यास सांगितला. तेव्हा ट्रूकॉलरला तो क्रमांक आकाश वाघमारेचा असल्याचे स्पष्ट झाले. तो पतीचाच मित्र असल्याचे स्पष्ट झाले.पतीसमोर पुन्हा विनयभंग...पतीने याबाबत वाघमारेकडे जाब विचारला, तेव्हा त्याने पतीलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि पतीसमोरच नेहाला पुन्हा जवळ ओढण्याचा प्रयत्न केला.अखेर पोलिसांत धाववाघमारेला धडा शिकविणे गरजेचे असल्याने, शनिवारी नेहाने वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी वाघमारेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.