नालासोपाऱ्यात पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:18 AM2020-11-22T09:18:53+5:302020-11-22T09:18:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : पूर्वेकडील एव्हरशाइन सिटीमध्ये राहणाऱ्या पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली ...

Husband and wife commit suicide by hanging in Nalasopara | नालासोपाऱ्यात पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

नालासोपाऱ्यात पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा : पूर्वेकडील एव्हरशाइन सिटीमध्ये राहणाऱ्या पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. पैशांच्या चणचणीमुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तुळिंज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास करत आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाइन सिटीमधील सेक्टर नंबर ४ मध्ये राहुल धना चव्हाण (२८) आणि ज्योती राहुल चव्हाण (२३) हे दाम्पत्य राहत होते. त्यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. राहुल हा मेट्रोमध्ये गार्डची नोकरी करायचा. १८ हजार रुपये येणाऱ्या पगारात घरातील खर्च भागत नसल्याने पैशांवरून दोघांमध्ये वाद होत असल्याचे सूत्रांकडून कळते. या दोघांनी शुक्रवारी राहत्या घरात पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या मावशीला संध्याकाळी घरात लाइट चालू नसल्याने संशय आला व पती कामावरून आल्यावर घर आतून बंद असल्याने दरवाजा तोडल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास मावशीने तातडीने तुळिंज पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून त्यांचा अहवाल आल्यावर नक्की कारण कळेल, अशी माहिती तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.बी. सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. दोन दिवसांपूर्वी वसई पूर्वेकडील भोयदापाडा गावात राहणाऱ्या पती व पत्नीने जेवणातून विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

Web Title: Husband and wife commit suicide by hanging in Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.