‘ती’ झोपली की, पती अश्लील फोटो काढायचा! पाच वर्षे छळ झाल्याची पत्नीची तक्रार
By गौरी टेंबकर | Published: August 24, 2023 11:04 AM2023-08-24T11:04:57+5:302023-08-24T13:44:08+5:30
माहेरच्या वस्तूंसह सॅनिटरी पॅडची सासरकडून मागणी
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई:
मॅट्रिमोनिअल साइटवरून लग्न जुळवले आणि वांद्रेच्या बंगल्यात थाटामाटात विवाहही झाला. मात्र लग्न झाल्यापासूनच पती आणि सासरच्या मंडळींनी मानसिक छळ सुरू केला. बेडरूममध्ये नाईट ड्रेसवर झोपलेली असताना पतीने गेल्या पाच वर्षांत ४० पेक्षा जास्त अश्लील फोटो माझ्या संमतीशिवाय काढले. ते फोटो व्हॉट्स ॲपवर पाठवत तो मानसिक त्रास द्यायचा, अशी तक्रार पीडित महिलेने वांद्रे न्यायालयात दिली आहे.
पीडित महिला एका नामांकित इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये कार्यरत असून वांद्रे पूर्व परिसरात राहते. एलिट मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून तिचे लग्न ठरले आणि ८ डिसेंबर, २०१९ रोजी मढच्या सुकून बंगल्यात तिचा विवाह झाला. मात्र तिलक कार्यक्रमापासूनच हळदी, मेहंदी कार्यक्रमाला अधिक खर्च होऊन लग्नाचा खर्च वाढेल, असे सांगत पतीने खर्चाला नकार दिला.
खाण्या-पिण्यावरून तसेच रिसेप्शनला घालण्याच्या ड्रेसवरूनही तो तिच्याशी भांडला. सब रिश्तेदार पुँछ रहे है की, दुल्हन कौन है, दुल्हन कौन है, असे म्हणत सासूने तिच्या दिसण्यावरूनही टोमणे मारले. पडदे, लाईट बोर्ड बदलल्याच्या रागात सासरे येथे असते तर त्यांनी तुला कापले असते, असे सासू म्हणाल्याचे पीडित महिलेने सांगितले.
माहेरच्या वस्तूंसह सॅनिटरी पॅडची सासरकडून मागणी
- खोटेनाटे आरोप व पतीच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळलेल्या महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करत लग्नाच्या वेळी माहेरून मिळालेल्या जवळपास १५० वस्तू परत मागितल्या.
- ज्यामध्ये सॅनिटरी पॅडचाही समावेश असल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
- पीडित महिला ऑक्टोबर २०२१ मध्ये पतीला घेऊन समुपदेशनासाठी गेली, मात्र त्याचा फायदा झाला नाही.
- पतीने तिच्याशी बोलणे बंद केले. पतीने काढलेले खासगी फोटो लीक करू, अशी सासऱ्यांनी धमकी दिली.
- तिला घरात येण्यासही विरोध केला. तिच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी तिचा नवरा आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.