हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी निवृत्त मुख्य अभियंत्याला अटक, १० मेपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:53 AM2019-05-08T06:53:51+5:302019-05-08T06:54:12+5:30

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी निवृत्त मुख्य अभियंता शीतला प्रसाद कोरी (५८) याला अटक केली आहे. तोही पुलाच्या आॅडिटिंगदरम्यान घटनास्थळी गैरहजर असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

HYDERABAD: Police detained for retirement of Chief Engineer | हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी निवृत्त मुख्य अभियंत्याला अटक, १० मेपर्यंत पोलीस कोठडी

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी निवृत्त मुख्य अभियंत्याला अटक, १० मेपर्यंत पोलीस कोठडी

Next

मुंबई -  हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी निवृत्त मुख्य अभियंता शीतला प्रसाद कोरी (५८) याला अटक केली आहे. तोही पुलाच्या आॅडिटिंगदरम्यान घटनास्थळी गैरहजर असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

१४ मार्चला सीएसएमटी येथील हा पूल कोसळून झालेल्या अपघातात सात ठार तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी जबाबदार धरत यापूर्वी डी. डी. देसाई या स्ट्रक्चरल आॅडिट कंपनीच्या नीरजकुमार देसाईसह पालिका अभियंता अनिल पाटील, एस. एफ. काकुळते यांच्यावर आझाद मैदान पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत अटकेची कारवाई केली. तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

या दुर्घटनेप्रकरणी कोरीचा निष्काळजीपणा उघड होताच त्यालाही सोमवारी रात्री उशिरा अटक झाली. कोरी हा एप्रिल २०१३ ते आॅगस्ट २०१८ पर्यंत पालिकेत मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होता. त्याच्याकडे हिमालय पुलासह विविध पुलांच्या आॅडिटिंगची जबाबदारी होती. त्याने घटनास्थळी हजर राहून तपासणीस प्राधान्य दिले नाही. तसेच साहाय्यक अभियंत्यांच्या कामाकडेही दुर्लक्ष केले. घटनेचे गांभीर्य लक्षात असतानाही दुर्लक्ष केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करत वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली. त्याच्या अटकेच्या वृत्ताने धक्का बसलेल्या अभियंत्यांनी न्यायालयात गर्दी केली होती. कोरी यांचे वकील अश्विन टूल यांनी वाढीव कोठडीला विरोध केला. कोरी हे २०१८ मध्ये निवृत्त झाले. हिमालय दुर्घटना १४ मार्चला घडली. त्या वेळी ते कार्यरत नव्हते. ते निवृत्त झाल्यामुळे अधिकृत कागदपत्रे कार्यालयात आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढीव कोठडीला अर्थ नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार, आझाद मैदान पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आतापर्यंतची चौथी अटक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पुलाच्या आॅडिटिंगवेळी हा पूल व्यवस्थित असून पुलासाठी केवळ किरकोळ दुरुस्ती सुचविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर १४ मार्चला हा पूल कोसळून सात जणांना नाहक जीवास मुकावे लागले. या दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत डी. डी. देसाई या स्ट्रक्चरल आॅडिट कंपनीचे नीरजकुमार देसाई, पालिका अभियंते अनिल पाटील तसेच एस. एफ. काकुळते यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता पालिकेचे निवृत्त मुख्य अभियंते शीतला प्रसाद कोरी यांनाही अटक करण्यात आल्याने आतापर्यंतची ही चौथी अटक आहे.

Web Title: HYDERABAD: Police detained for retirement of Chief Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.