सराफ हत्येप्रकरणी हैदराबाद पोलिसांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:13 AM2020-03-05T00:13:07+5:302020-03-05T00:13:11+5:30
नाशिक येथील सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांच्या हत्येची चौकशी व्हावी हैदराबाद पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
मुंबई : नाशिक येथील सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांच्या हत्येची चौकशी व्हावी हैदराबाद पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. पवार यांनी शिष्टमंडळासमोर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह दुरध्वनीवर चर्चा करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बिरारी यांना हैदराबाद पोलिसांनी त्यांच्या दुकानातून बेकायदपणे ताब्यात घेतले होते व अधिकृत अटक न करता २४ तांस डांबले आणि नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी व्हावी व हैदराबाद पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मनसेच्या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात माजी मंत्री बाळा नांदगावकर, माजी आमदार अॅड जयप्रकाश बाविस्कर, आमदार राजू पाटील, अविनाश अभ्यंकर यांचा समावेश होता.