Join us

मुंबई विमानतळावर 50 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक 'वीड' जप्त, सोने आणि हिरेही आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:04 IST

कस्टम विभागाने आठ तस्करांनाही अटक केली आहे.

Mumbai Airport :मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 50 कोटींहून अधिक किमतीचे हायड्रोपोनिक विड, सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच कस्टम विभागाने आठ जणांना अटक केली आहे. 28 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान विशेष कारवाई ही जप्ती करण्यात आली.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईविमानतळावर केलेल्या या विशेष कारवाईत 50.16 कोटी रुपये किमतीचे 50.11 किलो हायड्रोपोनिक वीड, 93.8 लाख रुपये किमतीचे हिरे आणि 1.5 कोटी रुपये किमतीचे 2.073 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. हायड्रोपोनिक विड हे एक प्रकारची नशा आहे. हे गांजाच्या श्रेणीत येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला खूप मागणी आहे. त्यामुळेच त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.

विमानतळावर तस्करी वाढलीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज तस्करीची प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या महिन्यातच विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघडकीस आले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला होता. या कारवाईत विमानतळावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात घेतले होते. ते दोघे तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेत असताना रंगेहात पकडण्यात आले.  तपासादरम्यान सोन्याचे वजन 6.05 किलो असल्याचे उघड झाले, ज्याची बाजारातील किंमत 4.84 कोटी रुपये आहे. 

टॅग्स :अमली पदार्थमुंबईविमानतळ