मुंबई : स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा करणार आहे. स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे. या भूमिकेतून १ ते १५ सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१९पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याच अनुषंगाने सप्टेंबर महिन्यातील १ ते १५ हे दिवस स्वच्छ भारत पंधरवडा साजरा होणार असून, यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ हे मिशन संपूर्ण देशभरात सुरू आहे. राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद म्हणूनच महाराष्ट्रातही स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र हे अभियान सुरू करण्यात आले आहे.स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ सप्टेंबरला सर्व शाळा आणि शिक्षण संस्थांमध्ये स्वच्छता शपथ घेतली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होतील. पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती/ पालक शिक्षक संघ आणि शिक्षकांमध्ये बैठका आयोजित करण्यात येणार. या बैठकांतून मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे. शाळा आणि घरांमध्ये स्वच्छता कशी असावी, यासाठी मुलांना प्रोत्साहित करणे. शिक्षकांनी शाळेतील/शैक्षणिक संस्थेतील स्वच्छतेच्या सुविधांची तपासणी करावी तसेच आवश्यकता वाटल्यास सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रस्ताव/योजना तयार करावी. जिल्हा/तालुका/पंचायत स्तरावर स्वच्छ परिसर आणि व्यवस्थित शौचालयांसाठी स्पर्धांचे आयोजन करणे. विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. स्वच्छतेवर वाद-विवाद स्पर्धा आयोजित करणे. स्वच्छतेविषयीचे संदेश शाळेच्या/शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, स्वच्छतेविषयीची छायाचित्रे शाळेमध्ये प्रकाशित करणे.स्वच्छता पंधरवड्यानिमित्त शाळा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाने काय करावे?जुन्या अभिलेखांची नोंदणी करून अनावश्यक असलेली कागदपत्रे काढून टाकावीत. नियमानुसार जुन्या फाइल्स आणि अभिलेख दप्तरी दाखल करावे.शाळा परिसरातून सर्व प्रकारचे टाकाऊ सामान जसे मोडके फर्निचर, निरुपयोगी उपकरणे, नादुरुस्त वाहने नियमाप्रमाणे निर्लेखन करुन पूर्णत: काढून टाकावीत.शिक्षक आणि विद्यार्थी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्वच्छता पंधरवड्याचा प्रचार जवळील नागरी वस्तीत करावा.ओला कचरा/सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याविषयी जागरुकता निर्माण करावी.स्वच्छ पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची उद्दिष्टे पूर्ण होणे आवश्यक आहे.प्रत्येक मुलास हात धुण्याच्या ७ पायºया शिकवून प्रत्येक वेळी त्याप्रमाणे हात धुण्याची सवय लागणे.जेवणापूर्वी योग्य पद्धतीने हात धुण्याची सवय लावणे.प्रत्येक वेळा शौचास जाऊन आल्यानंतर योग्य पद्धतीने हात धुण्याची सवय लावणे.
शाळांमध्ये राबविला जाणार स्वच्छता पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:57 AM