Join us

आदिवासी महिलांना स्वच्छतेचे धडे; मोफत सॅनिटरी पॅडचेही केले वाटप

By मनोहर कुंभेजकर | Published: March 13, 2023 6:16 PM

जागतिक महिला दिनानिमित्त आरेच्या आदिवासी पाड्यांच्या महिलांना स्वच्छतेचे धडे दिले.

मुंबई - एकीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विविध विकास उपक्रम राबवून मुंबईचा चेहरामोहरा बदलत असतांना, आजही मुंबईचे गोरेगाव पूर्व आरे येथील आदिवासी पाडे मूलभूत आणि आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. याबाबीची दखल घेत अंधेरी येथील अभिषेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने आरेच्या गावदेवी पाडा, मटाई पाडा, खांबाचा पाडा या आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक महिला दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आणि विशेष करून राज्यातील आदिवासी बांधवांच्या शिक्षण,आरोग्यासाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे व युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने

जागतिक महिला दिनानिमित्त आरेच्या आदिवासी पाड्यांच्या महिलांना स्वच्छतेचे धडे दिले. तर सुमारे २०० महिलांना मोफत सॅनिटरी पॅड, जीवनावश्यक वस्तू व स्नॅक्स  वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त या संस्थेमार्फत महिनाभर मुंबई सह राज्यातील इतर आदिवासी पाड्यांच्या शेकडो महिलांना हा उपक्रम राबविण्याचा व २००० महिलांना मोफत सॅनिटरी पॅड देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.तर या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यां मधील प्रत्येक आदिवासी महिलांच्या आरोग्याची काळजी घेवून महिलांच्या आरोग्याशी निगडित सर्व समस्या दूर करणार तसेच त्यांच्यासाठी दरमहा मोफत सॅनिटरी पॅड संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्याचा मानस सुनीता नागरे यांनी व्यक्त केला. या संस्थेकडून असोसिएट प्रोफेसर हेड ऑफ इन्फॉर्मेशन ठाकूर कॉलेज डॉ.संगीता व्हटकर यांना सन्मानित केले. त्यांनी व  गीता दिक्षित यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

या उपक्रमाला युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सोहम सावळकर, डॉ. महेश अभ्यंकर, मधु राठी , प्रकाश फटनानी, दिलीप साहू, किरण सनस, आर्यन जॉन या सर्वांचे योगदान लाभले.तर मनोज शिवणकर, दत्ताराम कानडे, प्रसाद मराठे,वनिता सुतार, सुरेखा घुटे, इंद्रजीत परब, ऋतुजा नागरे अभिषेक नागरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  मोलाचे सहकार्य दिले. 

टॅग्स :महिलाआदिवासी विकास योजनामुंबई