Join us

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्‍या महाराष्‍ट्रातील सीएसआर प्रकल्‍पांचं उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:37 PM

कला, आरोग्‍य व स्‍वच्‍छता क्षेत्रांमध्‍ये पाठबळ वाढवण्याचा उपक्रमांचा मानस 

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिडेटच्या (एच एमआयएल) सीएसआर शाखेने महाराष्‍ट्रात कला, आरोग्‍य व स्‍वच्‍छता क्षेत्रांमध्‍ये विविध कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांच्‍या शुभारंभाची घोषणा केली. मुंबईतील बॉम्‍बे आर्ट सोसायटी येथे ग्रामीण या उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमाचं ग्रामीण विकास व युवा व्‍यवहार गिरीष महाजन यांनी कौतुक केलं.उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या प्रकल्‍पांमध्‍ये एचएमआयएफच्‍या प्रमुख 'आर्ट फॉर होप' उपक्रमाच्‍या तिसऱ्या सीझनअंतर्गत २-दिवसीय सांस्‍कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. 'आर्ट फॉर होप' उपक्रम भारतभरातील १० दिव्यांग अनुदान प्राप्‍तकर्त्यांना सन्‍मानित करतो. या कार्यक्रमादरम्यान ५ टेलिमेडिसीन क्लिनिक्‍सचे अनावरण करण्‍यात आलं आणि स्‍पर्श संजीवनी प्रकल्‍पांतर्गत २ मोबाइल मेडिकल व्‍हॅन्‍सना हिरवा झेंडा दाखवण्‍यात आला.

याव्‍यतिरिक्‍त, प्रकल्‍प 'H₂OPE' चा भाग म्‍हणून गडचिरोलीमधील १०० शाळांमध्‍ये १०० वॉटर आरओ सिस्‍टम्‍सचं व्‍हर्च्‍युअली अनावरण करण्‍यात आलं  ''मी एचएमआयएफचं या सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून नागरिकांचे जीवन सुधारण्‍याप्रती कटिबद्धतेसाठी कौतुक करतो. टेलिमेडिसीन क्लिनिक्‍स, मोबाइल मेडिकल व्‍हॅन्‍स आणि वॉटर आरओ सिस्‍टम्‍स संपूर्ण महाराष्‍ट्रात मोठ्या प्रमाणात योग्‍य आरोग्‍यसेवा व स्‍वच्‍छता उपलब्‍ध करून देतील. आम्‍ही अशा सहयोगात्‍मक प्रयत्‍नांचे कौतुक करतो,' असं गिरीष महाजन म्हणाले. 

५ टेलिमेडिसीन क्लिनिक्‍स: आरोग्‍यसेवा मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये एचएमआयएफनं महाराष्‍ट्राच्‍या काही भागांमध्‍ये ५ टेलि‍मेडिसीन क्लिनिक्‍स स्‍थापित केले आहेत, ज्‍यांचा तळेगाव जिल्ह्यातील पैत, काडूस, वाडा, नावलक, उंबरे आणि सुदुंबरे या गावांमधील लोकांना फायदा होईल. हे क्लिनिक्‍स दुरून आवश्‍यक वैद्यकीय सल्‍लामसलत व आरोग्‍यसेवा देतील, ज्‍यामुळे आरोग्‍यसेवा प्रदाते आणि दुर्गम प्रदेशांतील रूग्‍ण यांच्‍यामधील तफावत दूर होईल. यासह, एच एम आय एफ भारतभरात ४० टेलि‍मेडिसीन युनिट्स ऑपरेट करेल, जेथे ही आकडेवारी देशभरात ५० युनिट्सपर्यंत घेऊन जाण्‍याचा मानस आहे.   

एच एम आय एफ ने नागपूर व औरंगाबादच्‍या दुर्गम भागांमध्‍ये वैद्यकीय सेवा देण्‍यासाठी आवश्‍यक वैद्यकीय सुविधांनी सुसज्‍ज २ सानुकूल मोबाइल मेडिकल व्‍हॅन्‍स देखील सादर केल्‍या आहेत. ज्‍यामुळे प्रत्‍यक्ष गरजू रूग्‍णांना निदान व उपचार सेवा उपलब्‍ध होतील. सहयोगाने, टेलि‍मेडिसीन क्लिनिक्‍स आणि मेडिकल व्‍हॅन्‍स जिल्‍ह्यातील १ दशलक्षहून अधिक ग्रामीण व्‍यक्‍तींच्‍या वैद्यकीय गरजांची पूर्तता करतील. 

शाळांमध्‍ये १०० वॉटर आरओ सिस्‍टम्‍स

विद्यार्थ्‍यांना शुद्ध पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये एच एम आयएफनं महाराष्‍ट्रातील वन जिल्‍हा गडचिरोलीमधील १०० शाळांमध्‍ये १०० आर ओ प्‍लांट्स बसवले आहेत. या उपक्रमाचा विद्यार्थ्‍याना सर्वोत्तम आरोग्‍य व स्‍वच्‍छतेबाबत प्रेरित करण्‍याचा, शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्‍याप्रती योगदान देण्‍याचा मानस आहे. या प्रकल्‍पाचा या भागांतील ३५,००० शालेय विद्यार्थ्‍यांना फायदा होईल.