Join us

मी पँथर असल्याने पँथर दत्तक घेतला - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 4:14 AM

पर्यावरणाच्या रक्षणाकरिता निसर्ग, वृक्षवल्ली आणि वन्यप्राण्यांवर प्रेम करा, असा संदेश देण्यासाठी आपण बिबट्या दत्तक घेतला आहे. पँथर कुणावरही अन्याय करीत नाही.

मुंबई : पर्यावरणाच्या रक्षणाकरिता निसर्ग, वृक्षवल्ली आणि वन्यप्राण्यांवर प्रेम करा, असा संदेश देण्यासाठी आपण बिबट्या दत्तक घेतला आहे. पँथर कुणावरही अन्याय करीत नाही. मात्र, त्याच्यावर कोणी अन्याय केला, तर तो सरळ नरडीचा घोट घेतो. मी स्वत: दलित पँथरचा पँथर असल्याने, वन्यप्राणी दत्तक योजनेत पँथरलाच दत्तक घेतले, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंगला क्रमांक ३ येथे शनिवारी रामदास आठवले कुटुंबीयांनी भीम बिबट्याला तिसऱ्यांदा दत्तक घेतले़ यावेळी त्यांनी दत्तक घेतलेल्या भीम पँथरचा नववा वाढदिवस साजरा केला. रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमा आठवले, रामदास आठवले यांचे पुत्र जीत आठवले आणि बहीण शकुंतला आठवले, उपविभागीय वन अधिकारी सचिन रेपाळ आणि आयोजक दिलीप व्हावळे आदींची उपस्थिती होती.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबट्याच्या पिंजºयाजवळ जाऊन रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेल्या भीमची पाहणी केली. भीम पँथर या बिबट्याला तीन वर्षांपूर्वी रामदास आठवले यांनी पुत्र जीत आठवलेच्या आग्रहास्तव दत्तक घेतले. तेव्हापासून ते दरवर्षी या बिबट्याला सांभाळण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला एक लाख २० हजार रुपये देतात. निसर्गावर प्रेम करा; झाडे लावा झाडे वाढवा; पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश देत, नागरिकांनी वन्यप्राण्यांना दत्तक घेण्याचे आवाहन आठवले यांनी केले. हा दत्तक सोहळा पाहण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 

टॅग्स :रामदास आठवले