Join us

जान्हवीच्या हत्येमध्ये मला गोवले जातेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खार पोलिसांकडून मला विनाकारण जान्हवी कुकरेजा हत्येप्रकरणात गोवले जातेय, असा आरोप आरोपी दिया पडलकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खार पोलिसांकडून मला विनाकारण जान्हवी कुकरेजा हत्येप्रकरणात गोवले जातेय, असा आरोप आरोपी दिया पडलकर हिने केला आहे. तिने ही सबब पुढे करत मंगळवारी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

खारमध्ये ३१ डिसेंबर, २०२० रोजी आयोजित पार्टीचा होस्ट यश अहुजा याच्या घरी बेडशीट आणि मिळालेल्या उशीवर सापडलेले रक्ताचे नमुने जान्हवी व दियाच्या रक्ताच्या नमुन्यांशी जुळत असल्याचे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. मात्र हे पुरावे पोलिसांनी तयार केल्याचे म्हणणे आहे. जान्हवीची हत्या करण्यात आली त्या वेळी ती पूर्णपणे शुद्धीत होती हेदेखील पोलीस सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. घटनेच्या ४३ ते ४४ तासांनंतर शरीरातील दारूचे प्रमाण जाणून तिची फक्त रक्ताची चाचणी केली; मात्र लघवीची चाचणी रद्द करण्यात आली. सहसा ४४ तासांनंतर रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण संपुष्टात येते; मात्र लघवीतून चार ते पाच दिवसांनंतरदेखील हे प्रमाण तपासता येते, असे तिच्या वकिलांचे म्हणणे आहे. पडलकर आणि श्री जोगधनकर यांच्यावर त्यांची मैत्रीण जान्हवी कुकरेजा हिची हत्या केल्याचा आरोप आहे.