‘मी आहे म्हणून’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:08 AM2021-02-23T04:08:55+5:302021-02-23T04:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘अस्तित्व’ आणि ‘चारमित्र’ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४व्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ एकांकिका ...

‘As I Am’ became the best one-act play | ‘मी आहे म्हणून’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

‘मी आहे म्हणून’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘अस्तित्व’ आणि ‘चारमित्र’ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४व्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ एकांकिका स्पर्धेत अथर्व थिएटर्स, बोरीवली या संस्थेची ‘मी आहे म्हणून’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली आहे. तर ‘आपुले मरण’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचे व अभिनयाचे पारितोषिक वर्षा दांदळे यांना ‘मी आहे म्हणून’ या एकांकिकेसाठी प्राप्त झाले. ‘आपुले मरण’ या एकांकिकेसाठी राजेश देशपांडे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार म्हणून श्याम चव्हाण (‘खेळ’), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून संदेश बेंद्रे (फ्लाइंग राणी) व सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून मनोहर गोलांबरे (परास्त मनसुबे) यांना पारितोषिके मिळाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘हसू आणि आसू’ हा विषय यंदा या स्पर्धेसाठी सुचवला होता. अंतिम फेरीचे परीक्षण शिरीष लाटकर व अभिजीत गुरू यांनी केले.

Web Title: ‘As I Am’ became the best one-act play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.