Join us

मी न घाबरणारा मराठा, उज्ज्वल निकम यांनी सांगितली मराठा समाजाची खासीयत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 3:56 PM

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, आयोजित कार्यक्रमोत उज्जल निकम बोलत होते.

ठळक मुद्देआम्हाला एक नवीन विचारांची दिशा आणि विचारांची मशाल पेटवायची आहे. कारण, बहुसंख्य मराठा आजही दारिद्र रेषेखाली आहे, त्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, याचं चर्चासत्र या वास्तूमध्ये होतील, असे उज्जल निकम यांनी म्हटलं.

मुंबई - वकिलांना भाषणाची सवय नसते, विशेष म्हणजे फुकट बोलायची तर सवय नसतेच. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे हा माझा कायमचा कटाक्ष असतो. मराठा समाजाकडे पैशाची श्रीमंती कमी असेल, पण मनाची श्रीमंती मोठी आहे, हीच मराठा समाजाची खासीयत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ विधिज्ञ उज्जल निकम यांनी मराठा समाजाची खासीयत सांगितली. तसेच, मी न घाबरणारा मराठा आहे, असेही ते म्हणाले 

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, आयोजित कार्यक्रमोत उज्जल निकम बोलत होते. या सोहळ्याला माजी राज्यपाल डी वाय पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, आप्पासाहेब पवार यांसह मान्यवर उपस्थित होते. 

मराठा या व्याख्येवरुन या शब्दाचं अनेकदा राजकारण केलं जातं ते थांबलं पाहिजे. आम्हाला एक नवीन विचारांची दिशा आणि विचारांची मशाल पेटवायची आहे. कारण, बहुसंख्य मराठा आजही दारिद्र रेषेखाली आहे, त्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, याचं चर्चासत्र या वास्तूमध्ये होतील, असे उज्जल निकम यांनी म्हटलं. या वास्तूकडे कोणीही कधी वाकड्या नजरेनं बघणार नाही याची मला खात्री आहे. कारण, मी आहे एक मराठा लाख मराठा. मराठा समाज शिस्तप्रिय आहे. कोपर्डी प्रकरणानंतर आपण शिस्तप्रिय मोर्चे काढून देशभरात आपली शिस्त दाखवून दिली, असे उज्जल निकम यांनी म्हटलं. मी न घाबरणारा मराठा आहे, म्हणूनच मी या कार्यक्रमाला आलो, तर एकनाथ शिंदे हे खंदा मराठ आहेत, असेही निकम यांनी आवर्जून सांगितले.  

टॅग्स :उज्ज्वल निकममराठामराठा क्रांती मोर्चामुंबईएकनाथ शिंदे