मी देवाचा अवतार नाही- धीरेंद्रकृष्ण शास्त्री­; ­मीरा राेड येथे दर्शन साेहळ्याला मोठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 08:16 AM2023-03-19T08:16:07+5:302023-03-19T08:17:46+5:30

भाजपच्यावतीने मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांनी एसके स्टाेन मैदानात हा साेहळा आयाेजित केला हाेता.

I am not an incarnation of God, Dhirendrakrishna Shastri; A large crowd attends the darshan ceremony at Mira Road | मी देवाचा अवतार नाही- धीरेंद्रकृष्ण शास्त्री­; ­मीरा राेड येथे दर्शन साेहळ्याला मोठी गर्दी 

मी देवाचा अवतार नाही- धीरेंद्रकृष्ण शास्त्री­; ­मीरा राेड येथे दर्शन साेहळ्याला मोठी गर्दी 

googlenewsNext

मीरा रोड : मी कुठलाही जादूटोणा करत नाही की देवाचा अवतार नाही. हिंदू धर्मासाठी आणि  समाजासाठी माझे जीवन समर्पित आहे. त्यासाठी आयुष्यभर काम करत राहणार आहे, असे प्रतिपादन बागेश्वर धाम सरकार अर्थात धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी मीरा रोड येथे शनिवारी केले.

भाजपच्यावतीने मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांनी एसके स्टाेन मैदानात हा साेहळा आयाेजित केला हाेता. धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोक आले होते. आपण आयुर्वेदाच्या मंत्र चिकित्सेने उपचार करतो.  आयुर्वेदिक उपचाराने  ४० टक्के रुग्णांना लवकर आराम मिळतो.

सनातन धर्माची आग धगधगती राहिली पाहिजे. ११ दिवस अखंड ज्योती प्रज्वलित ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित भक्तांना केले. यावेळी शास्त्री यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. रविवारी जास्त वेळ हा कार्यक्रम चालणार आहे. 

कडक पोलिस बंदोबस्त
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कार्यक्रमाला विराेध केल्याने माेठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच  मीरा रोड पोलिसांनी आयोजकांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती.  धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज  यांच्याकडून राज्यातील संत व महापुरुषांचा अवमान होणार नाही,  धार्मिक भावना दुखावणार नाहीत,   आदींची खबरदारी घेण्यास पोलिसांनी सांगितले होते. नोटीशीचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Web Title: I am not an incarnation of God, Dhirendrakrishna Shastri; A large crowd attends the darshan ceremony at Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.