Join us

"मी लग्न नाही केलं, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये ..." करुणा शर्मा प्रकरणात धनंजय मुंडेंच्या बाजूने युक्तिवाद काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:35 IST

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणाची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आज या प्रकरणातील सुनावणी झाली. दरम्यान, २९ मार्चपर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याने सुनावणी तहकूब केली आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या वकिलांनी आज कोर्टात कोणते युक्तिवाद केले याची माहिती दिली. 

संजय राऊतांनी सिंगापूरला जाऊन मानसोपचार घ्यावेत, खर्च सरकार करेल, देवेंद्र फडणवीसांचा टोला 

करुणा शर्मा यांचे वकील म्हणाले, आजच्या सुनावणीवेळी मुंडे यांनी लग्न केलेले नाही. त्यांचं म्हणणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो असा त्यांनी युक्तिवाद केला आहे. या रिलेशनशिपचा किती पिरेड आहे. हे गृहीत धरतात. २७ वर्षाचा पिरेड त्यातून दोन मुल जन्माला, त्यांचं वय १८, १९ वर्षे  हे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येणार नाही. दोन तीन वर्षाचा लिव्ह इन पिरेड असू शकतो, असंही वकील म्हणाले. 

"ते एक राजकीय संघटना चालवत आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली आहे. २९ तारखेला कोर्ट फायनल निकाल देणार आहे, असंही वकील म्हणाले.  

दरम्यान, यावर करुणा शर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. करुणा शर्मा म्हणाल्या, आम्ही १५ लाखांची पोटगीची मागणी केली आहे. कमीत कमी आम्हाला महिना नऊ लाख रुपये पाहिजे आहे.  मुंडे यांनी यांनी या सुनावणीला आव्हान दिले आहे. २९ मार्च रोजी यावर सुनावणी होणार आहे. 

या आधीच्या सुनावणीत काय झाले होते?

करुणा शर्मा यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचे निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये, तर त्यांच्या मुलीसाठी ७५ हजार रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश दिले होते. तर मुलगा २१ वर्षांचा असल्याने न्यायालयाने त्याच्यासाठी देखभालीचा खर्च देण्यास नकार दिला.

टॅग्स :धनंजय मुंडेन्यायालयलग्न