Join us

मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत नसतो, प्रकाश आंबेडकरांची आठवलेंवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 3:27 PM

प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसदर्भात बोलताना रामदास आठवलेंना अतिशय तुच्छ समजले आहे.

मुंबई - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यावर जहरी टीका केली आहे. आंबेडकर हे औवेसींसोबत जातात पण रिपबल्कीन पक्षातील नेत्यांशी बोलत नाहीत, असे आठवलेंनी म्हटले होते. त्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत नसतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसदर्भात बोलताना रामदास आठवलेंना अतिशय तुच्छ समजले आहे. विषेश म्हणजे आठवलेंची तुलना करताना चक्क कुत्र्या-मांजरांशी बोलत नसल्याचे ते म्हणाले. आम्ही कुणाच्याही मागे जात नाही, आमची आणि एमआयएम पक्षाची युती लोकसभा निवडणुकीनंतरी कायम राहणार असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच लोकसभेसाठी सोलापुरातून की अकोल्यातून याबाबत सांगताना त्यांनी येणारी वेळ ठरवेल असं म्हटलंय. मात्र, आगामी निवडणुकीत आम्ही आरएसएसला एक नंबरचा शत्रू समजत असल्याचं ते म्हणाले. हे बोलत असतानाच त्यांनी रामदास आठवलेंसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत नसल्याचे म्हटले. आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यातील मतभेद टोकाचे असल्याचे उघड होत आहे. 

टॅग्स :प्रकाश आंबेडकररामदास आठवलेलोकसभा