मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखतीनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत लवकरच पाहण्यास मिळणार आहे. या अनलॉक मुलाखतीचा पहिला प्रोमो सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवर पोस्ट केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आहे. येत्या 25 आणि 26 जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीत राज्यातील कोरोना परिस्थिती आणि ठाकरे सरकारच्या सहा महिन्यांच्या कारभारावर अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे. यासंबंधी काहीशी झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तरही दिल्याचे समजते. गेले ते सहा महिने विविध आव्हानं घेऊन आले होते. कोरोनो संकट हे अजूनही संपता-संपत नाही आहे. सरणार कधी हे रण...रण कधी संपणार हेच अजून कळत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
याशिवाय, 'लॉकडाउन आहेच, एक एक गोष्ट आपण सोडवत चाललो आहोत, मी म्हणजे ट्रम्प नाही, मी माझ्या डोळ्यासमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शरद पवार यांनी देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी बातम्या...
"बंदीचे कठोर पालन करा, अन्यथा....", मोदी सरकारचा चिनी अॅप्स कंपन्यांना इशारा
आता चीनच्या अडचणी वाढणार, मोदी सरकार नवीन नियम लागू करणार
Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...