मी एकमेव 'बँकचोर' आहे जो फेल गेला, रितेश देशमुखने उडवली नीरव मोदीची खिल्ली; ट्विटरकर फिदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 03:59 PM2018-02-21T15:59:05+5:302018-02-21T16:04:33+5:30
रितेश देशमुखचं हे ट्विट चाहत्यांना प्रचंड आवडलं असून 24 हजार जणांनी लाइक केलं असून साडेतीन हजाराहून जास्त जणांनी रिट्विट केलं आहे.
मुंबई - सध्या देशभरात आणि सोशल मीडियावर एका व्यक्तीवर चर्चा सुरु आहे ती म्हणजे नीरव मोदी. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११४०० कोटींचा गंडा घातल्याने सध्या जिकडे तिकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. एकीकडे या विषयावर गंभीर चर्चा सुरु असताना अभिनेता रितेश देशमुखने मात्र एक ट्विट केलं असून ट्विटरकर त्यावर फिदा झाले आहेत. रितेश देशमुखने 'मी एकमेव बँकचोर आहे, जो फेल गेला' असं म्हणत नीरव मोदींना टोला मारला आहे. रितेश देशमुखचं हे ट्विट चाहत्यांना प्रचंड आवडलं असून 24 हजार जणांनी लाइक केलं असून साडेतीन हजाराहून जास्त जणांनी रिट्विट केलं आहे.
I am the only ‘BANK-CHOR’ that failed. pic.twitter.com/E10PzOXe9i
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 20, 2018
2017 मध्ये रितेश देशमुखचा 'बँकचोर' नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या नावाचा फायदा घेत रितेश देशमुखने ट्विटरवरुन नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यावरुन टोला मारला आहे. रितेशचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला होता. 15 कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने फक्त 8 कोटींची कमाई केली होता. या चित्रपटात विवेक ओबेरॉयही प्रमुख भूमिकेत होता. आपल्या या फ्लॉप झालेल्या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश सध्या सोशल मीडियावर मात्र हिट झाला आहे.