मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, 'या' व्यक्तींना राज ठाकरेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 05:46 PM2021-03-14T17:46:03+5:302021-03-14T17:46:47+5:30

मनसेच्या सोशल मीडियातून मनसे सदस्य नोंदणीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

I am ready to give you a chance, Raj Thackeray's appeal to these people | मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, 'या' व्यक्तींना राज ठाकरेंचं आवाहन

मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, 'या' व्यक्तींना राज ठाकरेंचं आवाहन

Next


मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेकडून सभासद नोंदणी कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य व्हा... असे म्हणत मनसेनं माणसं जोडायला, सभासद नोंदणी सुरू केली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही सभासद नोंदणी होत असून मोबावर मिस्ड कॉल देऊनही आपण सभासद होण्यासाठी मनसेकडे अर्ज करु शकता. विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मनसेत सामील होण्याचं आवाहन केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरेंनी हे आवाहन केलंय.  

मनसेच्या सोशल मीडियातून मनसे सदस्य नोंदणीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यभरातील मनसैनिकांची सदस्य नोंदणी सुरु झाली असून ऑनलाईन सदस्य नोंदणीसाठी : https://mnsnondani.in या संकेत स्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यातआलंय. तसेच, स्थानिक शाखेशी संपर्क साधूनही तुम्हाला मनसेचा अधिकृत सदस्य होता येणार आहे. 

"विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे!", असे ट्विट राज यांनी केलंय. तसेच, 

15 वर्षांची मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वर्धापन दिन काही दिवसांपूर्वीच साजरा झाला. करोना संकटामुळं वर्धापनदिनाचा मेळावा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलं. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. 'मी तुम्हाला कधीही विसरणार नाही,' असा शब्दही राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर, आज 14 मार्चपासून मनसेनं सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्ष्य ठेऊन विविध क्षेत्रातील माणसं जोडण्याचा मनसेचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच, स्वत: राज ठाकरेंनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पक्षात सामिल होण्याचं आवाहन केलंय. 
 

Web Title: I am ready to give you a chance, Raj Thackeray's appeal to these people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.