Join us

'मी परिणाम भोगायला तयार, अभ्यंग स्नानानंतर फटाके फोडणारच'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 3:59 PM

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन आपण फटाके वाजवणार असल्याचे म्हटले आहे. मी ...

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन आपण फटाके वाजवणार असल्याचे म्हटले आहे. मी अभ्यंग स्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही. लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर फटाके वाजवणार. फटाके आणि दिवाळी अतुट नाते आहे. तर, मी परिणामही भोगायला तयार आहे, असे आव्हाड यांनी ट्विट करुन म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार, संध्याकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. फटाक्यांच्या धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची अटी आणि शर्तीनुसार परवानगी कोर्टाकडून देण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी परिणा भोगायला तयार आहे. पण, अभ्यंग स्नानानंतर फटाके फोडणारच, असे म्हटले. त्यामुळे एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारत फटाके फोडण्याला प्रोत्साहन देण्याचे काम आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे भाजपा खासदार चिंतामणी मालवीय यांनीही सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. 'हिंदू परंपरेत आम्ही कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही' असे एक ट्वीट मालवीय यांनी केलं आहे. 'मी दिवाळीचा सण परंपरेनुसारच साजरा करणार आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री 10 नंतर मी फटाके फोडणार', असे सांगत त्यांनीही थेट सुप्रीम कोर्टालाच आव्हान दिले आहे. 

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडफटाकेसर्वोच्च न्यायालयदिवाळी