न्यायालयावर माझा विश्वास आहे, मी कोणतेही चुकीचे काम केले नाही - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 02:41 PM2017-12-22T14:41:31+5:302017-12-22T20:04:16+5:30
न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कोणतीही चुकीची काम केली नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी समाधानी आहे.
मुंबई : आदर्श घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली चौकशीची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. यावर आज मुंबईत अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कोणतीही चुकीची काम केली नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी समाधानी आहे.
आदर्श प्रकरणासंदर्भात यापूर्वीच आपल्या विरोधात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पुन्हा खटला भरण्यास परवानगी मिळाली असती, तर हा चुकीचा पायंडा पडला असता. उच्च न्यायालयाने वस्तुस्थिती समजून घेत दिलेला निर्णय समाधानकारक असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्याबाबत मी काही बोलणार नाही, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
The truth has ultimately prevailed, we always had full faith in the country's judiciary: Ashok Chavan after getting relief in Adarsh scam case pic.twitter.com/IF2aSBsOKx
— ANI (@ANI) December 22, 2017
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यास आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) परवानगी दिली होती. आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010 मध्ये अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
#WATCH: Former Maharashtra CM Ashok Chavan addresses the media in Mumbai after relief in Adarsh Scam case https://t.co/cJACrNk5Fg
— ANI (@ANI) December 22, 2017
दरम्यान, गुरुवारी (21 डिसेंबर ) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने टू जी घोटाळाप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आज आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना मिळालेला दिलासा मिळाला आहे. तसेच, नांदेडमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाईचे वाटप करुन जल्लोष साजरा केला.
These issues were politically used around 2014 by BJP to malign the Congress party: Ashok Chavan,Congress after getting relief in Adarsh scam case pic.twitter.com/pYD6h9xLSR
— ANI (@ANI) December 22, 2017