मी Whatsapp चॅट पाहिला नाही; अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 04:18 PM2022-11-01T16:18:18+5:302022-11-01T16:18:49+5:30

तुमच्या घड्याळ प्रमाणे अडीच तास चौकशी झाली हे खरं आहे. मुळात एवढा वेळ ते चौकशी करत नव्हते. सुरुवातीला खूप वेळ तर आमच्या गप्पा झाल्या असं पेडणेकरांनी म्हटलं.

I did not see the Whatsapp chat; After two and a half hours of interrogation, Kishori Pednekar Target Kirit Somaiya | मी Whatsapp चॅट पाहिला नाही; अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

मी Whatsapp चॅट पाहिला नाही; अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

googlenewsNext

मुंबई - Whatsapp चॅट चा मुद्दा जेव्हा आला, अगदी सर्वच पक्षांचे नेते मी महापौर असल्यानं सर्वांशीच माझे चांगले संबंध आहेत. या सर्वांचेच व्हॉट्सअप चॅट असतात पण यातील किती चॅट मी पाहिलेत किती जणांना मी रिप्लाय केलेत उत्तर दिलेत हे देखील तपासले गेले पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीने जे काही व्हॉट्सअप चॅट दाखवले असतील ते समोरच्या व्यक्तीने केलेले मेसेज आहेत माझ्याकडून त्याला काही रिप्लाय दिलाय का? असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारला. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लावलेल्या आरोपानंतर किशोरी पेडणेकरांची आज दादर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर होत्या.

यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, माझ्यावर आरोप कोणी केलेत? एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने माजी खासदाराने केलेत प्रत्येक आरोपाला उत्तर दिलीच पाहिजेत याची गरज नाही. ज्यावेळी पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं त्याचवेळी पोलिसांना सांगितलं पुढचे तीन दिवस मी व्यस्त असेल त्यामुळे येऊ शकत नाही. पण त्यावेळी चुकीची बातमी चालवली गेली की किशोरी पेडणेकर चौकशीला सहकार्य करत नाहीत. कर नाही त्याला डर कशाला? ठरल्याप्रमाणे मी चौकशीला आले. अडीच तास चौकशी झाली. तुमच्या घड्याळ प्रमाणे अडीच तास चौकशी झाली हे खरं आहे. मुळात एवढा वेळ ते चौकशी करत नव्हते. सुरुवातीला खूप वेळ तर आमच्या गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची मला जी उत्तर माहिती होती ती मी त्यांना दिलेली आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने सर्व प्रकरण रंगवले जाते त्यातील दहा टक्के सुद्धा खरं नाही असं त्यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली आहे. त्यांची जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी जाईल. मी त्यांना माझं निवेदन देणार आहे. एकनाथ शिंदे हे मूळ शिवसैनिक आहेत. त्यामुळे माझा हक्क आहे त्यांना भेटण्याचा. या प्रकरणात साप म्हणून दोरी बडवायची हे झालेला आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. त्याचसोबत किरीट सोमय्यांबाबत विचारलं असता, त्या व्यक्तीवर मी बोलणार नाही. त्या माणसावरून उत्तर देणार नाही ही आता कायद्याची लढाई सुरू आहे. मी कायद्यानेच त्यांना उत्तर देईल असं पेडणेकरांनी म्हटलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: I did not see the Whatsapp chat; After two and a half hours of interrogation, Kishori Pednekar Target Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.