मला ‘फाशी’ नको!

By admin | Published: June 21, 2017 03:02 AM2017-06-21T03:02:28+5:302017-06-21T03:02:28+5:30

१९९३ बॉम्बस्फोटातील ५ दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचे, विशेष सरकारी वकिलांनी टाडा

I do not want to be hanged! | मला ‘फाशी’ नको!

मला ‘फाशी’ नको!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १९९३ बॉम्बस्फोटातील ५ दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचे, विशेष सरकारी वकिलांनी टाडा न्यायालयाला सोमवारी सांगितले. त्याचा धसका घेत, फिरोज खान याने आपल्याला फाशीची शिक्षा देऊ नये, अशी याचना न्यायालयाकडे केली आहे.
फिरोज खान याने सोमवारी विशेष न्यायालयात अर्ज केले होते. त्यापैकी एक अर्ज त्याने ‘प्रोबेशन आॅफ आॅफेंडर अ‍ॅक्ट’अंतर्गत केला आहे. या कायद्यांतर्गत पहिल्यांदाच दोषी ठरविलेल्या व्यक्तीची शिक्षा स्थगित केली जाऊ शकते व त्याला प्रोबेशन मिळू शकते. स्वत:ची बाजू न्यायालयापुढे मांडण्यासाठी फिरोज खान मंगळवारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला. ‘मला फाशीची शिक्षा देऊ नका. पोलिसांनी अटक केल्यापासून मी कारागृहातच आहे. माझी मुले लहान आहेत. त्यांना मी कुठे आहे, हे माहीत नाही. मात्र, मी एक दिवस परत येईन, अशी त्यांना आशा आहे. शिक्षा ठोठावल्यानंतर मी एकही दिवस फर्लो किंवा पॅरोलवर जाणार नाही,’ अशी दयायाचना फिरोज खान याने न्यायालयाला केली. दरम्यान, दोषींना कोणती शिक्षा ठोठावायची, याबाबत विशेष सरकारी वकील दीपक साळवी बुधवारपासून युक्तिवादाला सुरुवात करणार आहेत.

Web Title: I do not want to be hanged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.