मुंबई- गेल्या काही दिवसापासून भाजप- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भात आता चौकशीही सुरू आहे. दरम्यान, आता भाजप नेते मोहित कंबोज यांनीही शिवसेनेवर आरोप करत आव्हान दिले आहे.
'पाणी साचल्याची तक्रार काय करता...' मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आदित्य ठाकरे संतापले
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मोहित कंबोज यांनी एक फोटो ट्विट करत ठाकरे यांना चॅलेंज दिलं आहे. या ट्विटमध्ये कंबोज यांनी, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणणारे कोव्हिड काळात कोण कोण कुठे दारू पिऊन कसली जबाबदारी निभावत होते, याचा एक व्हिडीओ ट्रेलर मी दाखवला आहे. अजून माझ्याकडे ११० व्हिडीओ बाकी आहेत. तयार असाल तर दररोज एक सँपल द्यायला सुरुवात करतो, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे.
'सध्या माझ्याकडे बोरिवली नॅशनल पार्क ते बॉलीवूड गँग पार्ट्यांचे व्हिडीओ आहेत, कोणाला तोंड दाखवता येईल की नाही, हे नंतर कळेल, मी कमी बोलत आणि काम जास्त करतो, असंही यात म्हटले आहे.
'काही लोकांनी मला रोखले आहे, इतिहास साक्षी आहे की माझा शब्द आणि तारीख कधीच चुकली नाही, स्ट्राइक रेट: १००% उद्धव ठाकरे हे चॅलेंज स्वीकारले तर उद्या नमुना व्हिडीओ देईन असे, असं आव्हान कंबोज यांनी ट्विटमध्ये दिलं आहे.
मागील वर्षी शिवसेनेत बंडे झाले तेव्हापासून भाजप नेते मोहित कंबोज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या निशाण्यावर आहेत. या बंडावेळी मोहित कंबोजही सुरत, गुवाहटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. काही दिवसापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
"माझ्याकडे १३ व्हॉईस रेकॉर्डिंग, जास्त फडफड केली तर...;
काल शिवाजी मंदिरमध्ये एक नाटक होतं. आपलं घर वाचवण्यासाठी एक माणूस पाटण्याला गेलेला. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली नव्हती. पण स्वतःचा मुलगा वय गेल्यानंतर एक बाप काल आम्ही तुमचे व्हॉट्सॲप काढू, घरात घुसू अशा धमक्या देत होते, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच जो स्वतःच्या सख्ख्या भावाचा झाला नाही. जयदेव ठाकरे यांचं न्यायालयातील स्टेटमेंट बघा. त्यांनी स्वतः यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी हडप करण्याचं षडयंत्र कोर्टात सांगितल आहे, असेही राणेंनी सांगितले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
"महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार जो कॅगचा रिपोर्ट आला. त्यानुसार आमच्या नेत्यांनी मागणी केली आणि चौकशी सुरू झाली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांची काळजी वाटते मग तुम्ही चंदू मास्तर यांना किती वेळा भेटलात? सूरज चव्हाण सह्याद्रीला बसून मोठ्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन करून बोलवून घ्यायचा. मी अधिकारी वर्गाला आवाहन करेन, विनंती करेन. तुम्ही काम करत असताना जे जे लोक तुमच्यावर दबाव टाकायचे त्यांची नावं घ्या", असे नितेश राणे यांनी सूरज चव्हाण प्रकरणाबद्दल म्हटले.