Join us

'आज माझ्याकडे अर्थखातं, कधीपर्यंत टीकेल माहित नाही'; अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 5:21 PM

काल उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. येथील पाच संस्थांच्या बैठकीसाठी अजितदादा उपस्थित होते.

काल उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. येथील पाच संस्थांच्या बैठकीसाठी अजितदादा उपस्थित होते. दुसरीकडे केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते, यावेळी अजितदादांच्या गैरहजेरीवर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या, तर काल अजितदादांनी केलेल्या एका वक्तव्यामुळेही जोरदार चर्चा सुरू आहेत. 

अमित शहांच्या दौऱ्यात अजित पवार गैरहजर; नाराजीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

काल बारामती येथे एका संस्थेच्या बैठकीवेळी अजित पवार यांनी भाषण केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढं अर्थखातं टिकेल की नाही टिकेल, हे सांगता येत नाही', असं विधान अजितदादांनी केलं. या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. महायुतीत अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 

अजित पवार म्हणाले, टोरंटो सीएनजी गॅस एजन्सी देत असल्याची माहिती मिळाली. यानंतर लगेचच खरेदी विक्री संघासाठी टोरंटो गॅस एजन्सी घेतली. शेवटी आपल्या संस्था ताकदवान आणि आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. आज माझ्याकडं अर्थखातं आहे, त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, पुढं टिकेल, सांगता येत नाही. मात्र, खरेदी विक्रीय संघ, दूध संघ, बारामती बँक, माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती कारखाना हे पण ताकदीचे झाले पाहिजेत. जिथे चुका होत असतील तर दुरुस्त केल्या पाहिजेत, असंही अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, भविष्यात काय होईल हे कुणालाच माहित नसतं. यामुळे पवार यांचे हे विधान नैसर्गिक आहे, ते राजकीय विधान नाही, असंही बावनकुळे म्हणाले.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा