‘मुझे हर तरह का नशा करना है...’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:31 AM2018-05-19T05:31:32+5:302018-05-19T05:31:32+5:30

अथर्व शिंदे (२०) याच्या मृत्यूचे कारण शोधताना तपासाचा भाग म्हणून काही मुलांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.

'I have to make all kinds of intoxication ...' | ‘मुझे हर तरह का नशा करना है...’!

‘मुझे हर तरह का नशा करना है...’!

Next

मुंबई : अथर्व शिंदे (२०) याच्या मृत्यूचे कारण शोधताना तपासाचा भाग म्हणून काही मुलांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. जे ऐकून आरे पोलीसही चक्रावून गेले. नशेत असतानाही आणखी नशा करायची असल्याचे ते पोलिसांना सांगत होते. त्यामुळे नशेच्या व्यसनात ओढल्या गेलेल्या या भावी पिढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
रॉयल पाममधील ‘द विलाह्ण २१२ मधील पार्टीत सहभागी झालेल्या १० ते १२ मुलांचे जबाब आरे पोलिसानी नोंदविले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यातील एका मुलाने जबाब देताना ‘मुझे हर तरह का नशा करना है...’ असे सांगितले आहे. त्याचे ते वाक्य ऐकून तपास अधिकारी चक्रावून गेले. अमली पदार्थाच्या नशेमुळे या मुलांना नीट बसताही येत नव्हते. नीट बसा असे सांगूनदेखील वारंवार या मुलांचे हातापायाचे काही चाळे सुरू होते. दुसरा एक मुलगा सरळ हात आणि पाय पसरूनच तपास अधिकाऱ्याच्या समोर बसून बोलत होता. तिसºया मुलाला निव्वळ घाबरविण्यासाठी एका कॉन्स्टेबलने त्याच्यावर दांडा उगारला, तेव्हा त्याला भीती वाटणे तर दूरच राहिले, उलट त्या कॉन्स्टेबलला त्याने हाताने रोखत ‘कुल’ असे म्हटले. जबाब नोंदविल्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर येऊन काही मुले तोंड वेडीवाकडी करून, पोलिसांची नक्कल करून दाखवत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
... त्यानंतरच पुढील तपास
आरे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी आमच्याकडे आले आहेत. मात्र, संपूर्ण कागदपत्रे अद्याप आमच्याकडे आलेली नाहीत. ती आल्यानंतर आमचा पुढील तपास सुरू होईल, असे युनिट ११च्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. फॉरेन्सिक लॅबचा अंतिम अहवाल या प्रकरणातील तथ्य समोर आणण्यात उपयोगी ठरणार आहे.
>अद्याप कागदपत्रे मिळाली नाहीत
अथर्वचे वडील आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांनी हे प्रकरण क्राइम ब्रांच कक्ष ११ कडे वर्ग करण्याबाबत सहापानी पत्र पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना दिले होते. अथर्वची रॅगिंग करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. मात्र, पार्टीतील मुले ही उच्चभ्रू कुटुंबातील असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न आरे पोलीस करत आहेत. त्याच्या हत्येला नऊ दिवस उलटूनही अद्याप काहीच पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याची मैत्रीण आणि दोन तरुण त्याचा पाठलाग करताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. या घटनेनंतर तिने स्वत:ला खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले. त्यामुळे तिचीदेखील चौकशी केली जावी, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. पुरावेदेखील नष्ट करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, हे प्रकरण आता क्राइम ब्रांचच्या कक्ष ११ कडे वर्ग करण्यात आले आहे.

Web Title: 'I have to make all kinds of intoxication ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.