भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आले होते याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील वाय बी चव्हाण सेंटर मध्ये उपस्थित होते. त्यामुळे मंगेश चव्हाण हे शरद पवारांची भेट घेऊन आले की काय अशी चर्चा होती मात्र माध्यमांनी त्यांना याबाबत विचारले असता मी आजपर्यंत मी कधी पवारांच्या सावळीत उभं राहिलो नाही आणि पुढे कधी गरज ही पडणार नाही, असे म्हणत टोला लगावला.
विश्व अहिराणी साहित्य संमेलनाचा उद्या कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे त्यामुळे याचे नियोजन योग्य पद्धतीने झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे वाय बी चव्हाण सेंटर येथे आज आले होते. त्याच वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेतेमंडळी देखील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित होते उद्या त्यामुळे मंगेश चव्हाण आणि शरद पवार यांची गुप्त भेट झाली की काय अशी चर्चा सुरू होती. यावर मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीला टोला लगावला.
मंगेश चव्हाण म्हणाले की आजवर मी दहा फुटावर देखील शरद पवारांच्या उभे राहिलो नाही. मी त्यांच्या सावलीत आजवर कधीही नाही आणि पुढे उभा राहण्याची गरज देखील नाही. मी इतका मोठा नेता नाही की त्यांची भेट घेईल. आमचे भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची भेट घेतील, आम्ही कशाला घेऊ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत, मी कार्यक्रमाच्या नियोजन पाहायला आलो होतो, असं सांगत होणाऱ्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.