Join us

मी पक्षाचा झेंडा बदललेला नाही, आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 8:20 PM

मनसेने आज बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला आहे.

ठळक मुद्दे मी माझ्या झेंड्याचा रंग बदललेला नाहीमचे हिंदुत्व काय आहे हे जगाला माहिती आहेआम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही. आमचे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे आणि ते शुद्ध आहे

मुंबई - गेल्या महिन्यात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मनसेने झेंडा बदलून  पक्षाच्या ध्येयधोरणात आमुलाग्र बदल केले होते. दरम्यान, मनसेने आज बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे हे जगाला माहित आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या राजकीय भूमिकेत मोठा बदल करत कट्टर हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्यातच आज मनसेने महामोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यादरम्यान, उद्धव ठाकरे मनसेच्या मोर्चाबाबत म्हणाले की, मी माझ्या झेंड्याचा रंग बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे हे जगाला माहिती आहे. आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही. आमचे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे आणि ते शुद्ध आहे.'' दरम्यान,आज शिवसेना आमदारांची बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत  आमदारांना सीएए आणि एनआरसीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराज ठाकरेमनसेहिंदुत्वराजकारण