Join us  

माझ्याकडे न्यायालयाची कोणतीही प्रत आलेली नाही - गोविंदा

By admin | Published: December 01, 2015 9:26 PM

माझ्या पर्यंत कोणताही निर्णय अथवा नायालयाची प्रत आलेली नाही. मात्र, मी न्यायालयाचा आदर करतो असे अभिनेता गोविंदा याने म्हंटले आहे.

ऑनलाईन लोकमत

मुंबई, दि. १ -  माझ्या पर्यंत कोणताही निर्णय अथवा नायालयाची प्रत आलेली नाही. मात्र, मी न्यायालयाचा आदर करतो असे अभिनेता गोविंदा याने म्हंटले आहे. २००८ मध्ये 'मनी है तो हनी है' या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेता गोविंदाने एका चाहत्याच्या श्रीमुखात लगावली होती. त्यानंतर तक्रारकर्ते संतोष राय यांनी कायदेशीर लढा देत गोविंदा यांना थेट सर्वोच्च न्यायालयात खेचले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल देत गोविंदाला माफी मागण्याचे आदेश दिले, व हा वाद आपसात मिटवा, असा सल्ला न्या. तीरथसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने दिला आहे. ‘आप बडे हीरो है, बडा दिल भी दिखाईये’ असा टोलाही न्यायाधीशांनी मारला.
चित्रपटाच्या सेटवरील घटना...
> संतोष राय हे १६ जानेवारी २००८ रोजी ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटाच्या सेटवर गेले असता गोविंदा यांनी त्यांना येण्याचे कारण विचारत थापड मारल्याचे दृश्य व्हिडीओ क्लिपिंगमध्ये दिसून येते.
> राय यांनी २ फेब्रुवारी २००९ रोजी गोविंदा यांच्याविरुद्ध हेतुपुरस्सर जखमी करणे, शांतता भंग करण्यासाठी अपमानित करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती.
> महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेली खटल्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठी गोविंदा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने २०१३मध्ये ही तक्रार खारीज केली होती.