आय सपोर्ट इंदुरीकर महाराज... 'तमाशापुढं बसणारा आज किर्तनाला बसतोय'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 08:06 PM2020-02-13T20:06:43+5:302020-02-13T20:07:50+5:30

सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ सोशल

I support Indurikar Maharaj ...netizens stand with indurikar deshmukh maharaj | आय सपोर्ट इंदुरीकर महाराज... 'तमाशापुढं बसणारा आज किर्तनाला बसतोय'

आय सपोर्ट इंदुरीकर महाराज... 'तमाशापुढं बसणारा आज किर्तनाला बसतोय'

googlenewsNext

मुंबई - निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची किर्तने किंवा त्यांच्या क्लिप जशा व्हायरल होतात, तसंच इंदुरीकर महाराजांना सोशल मीडियावरुन पाठिंबाही देण्यात येत आहे. इंदुरीकर महाराजांनी गर्भलिंगनिदानची जाहिरात केल्यानं, तसं वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर महाराजांच्या किर्तनाला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तर, तितक्याच पद्धतीने सोशल मीडियावरुन महाराजांचे समर्थनही केले जात आहे.

सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि टिकटॉकवरुन हा व्हिडीओ व्हायरल होत असून गर्भलिंग निदान निवडीसंदर्भातील महाराजांच्या किर्तनातील वक्तव्याला आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे, पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यावरुन आता चांगलाच वाद पेटला असून महाराजांचे समर्थकही पुढे येत आहेत.    

''इंदुरीकर महाराज जे काही वाक्य बोलले, ते गुरुचरित्रात दिलेल्या 37 व्या अध्यायाच्या संदर्भाने... माहितीसाठी ओवी क्रमांक 51 पासून वाचून बघावं. महाराजांना बदनाम करून ज्याला मोठ व्हायचं असेल त्यांनी जरूर मोठ व्हावं. पण, महाराजांच वाक्य तोडून मोडून दाखवून फुकटची प्रसिद्धी घेऊ नये. महाराज किर्तनात समाजप्रबोधन करतात. कित्येक तरुणांची व्यसनमुक्ती केली. गावागावातील वरती बंद करून किर्तन चालु केली. अनाथ मुलांसाठी 10 वी पर्यंत मोफत शाळा चालवतात. राहिला प्रश्न महिलांचा तर, स्त्री भ्रूण हत्या, लेक वाचवा लेक शिकवा यांसारख्या विषयावर कीर्तनातुन समाजप्रबोधन करतात. हवं तर तुम्ही पूर्ण किर्तन बघू शकता.'' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, अनेकांनी आपल्या डीपीवर महाराजांचा फोटोही लावला आहे.  

''साधारण पालक व्हायची इच्छा असणाऱ्या प्रत्येक युवा जोडप्याला इंटरनेटवर चायनीज कँलेंडरनुसारजी माहिती मिळते तीच माहिती निवृत्ती महाराजांनी जाहीर किर्तनात बोलुन दाखवली. निवृत्ती महाराजांच्या किर्तनात दारुमुक्ती, व्यसनमुक्ती, विवाह समस्या, शाकाहारी समाजनिर्मिती, समाजाच अतिराजकारण प्रेम अश्या अनेक ग्रामीण समस्यांवर जबरदस्त विनोदी अंगाने मांडायचे कसब आहे. ज्यांच्यामुळे बरेच संसार वाचले, फुलले, मुल-मुली घरात राहिले आणि पालक सुखी झाले,'' असेही आपल्या फेसबुकवरुन नेटीझन्स सांगत आहेत. 

शिक्षक ते किर्तनकार
इंदुरीकर महाराज हे स्व:त जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांचे प्रेसेंटेसन आणि ज्ञान यांच्या जोरावर त्यांनी किर्तन व प्रवचनाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात इंदुरीकर महाराजांनी खेड्यापाड्यात सायकलवर जाऊन किर्तनाची सुरुवात केली. त्यांच्या किर्तनाला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळायचा, त्यामुळे त्यांच्या किर्तनाचा गावागावात तोंडी प्रसार झाला. सन 2000 साली इंदुरीकरांच्या किर्तनाची पहिली कॅसेट रेकॉर्ड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे 2 तासात 1 हजार कॅसेट विकल्या गेल्या. त्यानंतर, राजकीय नेते आणि गावातील पुढाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजांच्या किर्तनाचा आयोजन करण्यात येऊ लागला. जसा काळ बदलला तसं महाराजांच्या किर्तनाचं माध्यमही बदलत गेलं. महाराजांनी काळाप्रमाणे स्वत:ला अपडेट केलं, पण आजही त्यांच्या किर्तनातील भाषा, शैली आणि कंटेंट हा ग्रामीण भागातल्या बोलीचाच आहे. त्यामुळेच, युट्युबवरील त्यांची भाषण जगभरातील मराठी लोकांपर्यंत पोहोचत आहेत. युट्युबवर आणि सोशल मीडियावर त्यांच्या फोलोवर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.   


 

Web Title: I support Indurikar Maharaj ...netizens stand with indurikar deshmukh maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.