मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता मंत्रिपदावरुन माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २ जुलै रोजी झालेल्या शपथविधी अगोदर मलाही मंत्रिपदाची ऑफर होती, लगेच मुंबईला या असं सांगितलं होतं असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल CM शिंदेंचा गौप्यस्फोट, दिली वेगळीच माहिती
अनिल देशमुख म्हणाले, २ जुलै दिवशी शपथविधी झाला. त्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी मला दोनवेळा फोन केला होता. यात त्यांनी मला मंत्रिपदाची ऑफर दिला. माझ्यासह अनेक आमदारांना संपर्क केला होता. यातील काही आमदार मानले तर काहींनी त्यांना नकार दिला. पण, आम्ही शरद पवार यांच्यासोबत रहायचं असं ठरवलं होतं, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला.
'जास्त आमदारांची संख्या आपल्या बाजूने वळवण्यासाठी अनेकांना ऑफर दिल्या जात होत्या. पण, आम्ही साहेबांसोबत राहिलो आहे. तर काहीजण मंत्रिपदासाठी गेले, असंही देशमुख म्हणाले.
२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर अन्य आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांना अजुनही खाते वाटून दिलेले नाही. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन कार्यकर्त्यांची माफी मागितली.