Join us

मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:17 AM

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या धर्मराज कश्यपने तो १७ वर्षांचा असल्याचा दावा न्यायालयासमोर केला होता. तसा युक्तिवादही त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, गुन्हे शाखेने आधार कार्डवर त्याचे वय २१ असल्याचे सांगून न्यायालयात आधारकार्ड सादर केले. 

मुंबई : न्यायालयात पोलिस कोठडीसाठी हजर केल्यानंतर धर्मराज कश्यप याने स्वतःला १७ वर्षांचा सांगितल्याने गोंधळ उडाला. मात्र, गुन्हे शाखेने न्यायालयाच्या आदेशाने त्याच्या हाडांची  (बोन ऑसिफिकेशन टेस्ट) चाचणी केली. त्यात तो २१ वर्षांचा असल्याचे स्पष्ट होताच सोमवारी रात्रीच न्यायाधीशांच्या घरी हजर करून त्याची २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या धर्मराज कश्यपने तो १७ वर्षांचा असल्याचा दावा न्यायालयासमोर केला होता. तसा युक्तिवादही त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, गुन्हे शाखेने आधार कार्डवर त्याचे वय २१ असल्याचे सांगून न्यायालयात आधारकार्ड सादर केले. 

आरोपीला सुनावली २१ पर्यंत कोठडी - वयाबाबत तपासणीच्या मागणीनंतर धर्मराजचे निश्चित वय शोधण्यासाठी ‘बोन ऑसिफिकेशन’ चाचणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानंतर गुन्हे शाखेने तत्काळ त्याची चाचणी करत रात्रीच त्याला पुन्हा न्यायाधीशांच्या घरी हजर केले. 

- या चाचणी अहवालात तो २१ वर्षांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आता कश्यपची कसून चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीन्यायालय