Join us

त्यांची काल धिंड काढली, मी समजून घ्यायचो; सुवर्णा करंजेंच्या आरोपांवर सुनील राऊतांचे प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 12:40 PM

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा नगरसेवक इथे मोठ्या फरकाने निवडून येईल अशी मला खात्री आहे, असे प्रत्यूत्तर आमदार सुनील राऊतांनी दिले. 

संजय राऊत हे मोठे नेते आहेत, म्हणून त्यांना धमकी येण हे कॉमन आहे. आज कांजूरमार्ग येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. आरोप कोणावर होतात, जे लोक मोठे असतात त्यांच्यावर होतात.  तिचे कोणाशीच पटत नव्हते मी समजून घ्यायचो, ती गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा नगरसेवक इथे मोठ्या फरकाने निवडून येईल अशी मला खात्री आहे, असे प्रत्यूत्तर आमदार सुनील राऊतांनी दिले. 

संजय राऊतांच्या आमदार भावाने त्रास दिला! मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, माजी नगरसेविका शिंदेंच्या शिवसेनेत

विक्रोळी कांजूरमार्ग प्रभाग क्रमांक 117 च्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत आपल्याला त्रास देत होते, असा आरोप केला होता. यावर सुनील राऊत यांनी खुलासा केला आहे. ते हॉस्पिटल स्नेहल आंबेकर महापौर असताना वात्सल्य ट्रस्टला देण्याचे ठरले होते. मी आमदार झाल्यावर ते रद्द केले. संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांनी दाखवून द्यावे. त्या कशाला गेल्यात हे मला माहीत आहे. आर्थिक बाब आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. त्याशिवाय ती जाणार नाही, असा आरोप राऊत यांनी केला.

 सुवर्णा करंजे  यांची काल धिंड काढण्यात आली. आधी वर्षावर घेऊन गेले मग ठाण्यात घेऊन आले. श्रीकांत शिंदे येऊ दे, एकनाथ शिंदे येऊ दे, या कांजूर भांडुपमध्ये कोणी येऊ दे, इथे आमचाच माणूस निवडून येईल. माझ्या मतदार संघात मी कामे केली आहेत. आरोप करायला कोणी तरी हवे म्हणून माझ्यावर आरोप केले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे. 

करंजे काय म्हणालेल्या...

मला संपवण्याचा प्रयत्न झाला. कांजूर भांडुप पूर्व विभागात रुग्णालयाची गरज आहे. परंतू त्यात राऊत यांनी अडचणी आणल्या. आरक्षण बदलले. एकनाथ शिंदे यांनी मला आता शब्द दिला आहे. यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपण 500 सदस्य असलेल्या रिक्षा सेना आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मातोश्रीवर राग नाही, संजय राऊतांना वेळोवेळी सांगतिले होते. परंतू त्यांनी भाऊ असल्याने काही केले नाही, असा आरोप करंजे यांनी केला आहे. 

टॅग्स :सुनील राऊतएकनाथ शिंदेसंजय राऊतशिवसेना