मला न्याय हवा आहे, झिशान यांची आर्त साद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:41 PM2024-10-18T12:41:43+5:302024-10-18T12:42:15+5:30

झिशान यांनी बुधवारी सहपोलिस आयुक्त लखमी गौतम यांच्याशी तपासातील प्रगतीबाबत चर्चा केली. त्यानंतर, गुरुवारी दुपारीदेखील त्यांनी आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांकडून तपासाचा आढावा घेतला. या भेटीनंतर सायंकाळी त्यांनी ही पोस्ट टाकली. 

I Want Justice, says Zeeshan | मला न्याय हवा आहे, झिशान यांची आर्त साद

मला न्याय हवा आहे, झिशान यांची आर्त साद

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासाबाबत सलग दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी यांनी आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या भेटीनंतर झिशान सिद्दिकी यांनी ‘माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण करताना जीव गमावला. त्यांचा मृत्यू व्यर्थ जाता कामा नये. तसेच त्याचं राजकारणदेखील होऊ नये. मला माझ्या कुटुंबाला न्याय हवाय,’ अशा मागणीची पोस्ट समाजमाध्यमांवर टाकली आहे. 

झिशान यांनी बुधवारी सहपोलिस आयुक्त लखमी गौतम यांच्याशी तपासातील प्रगतीबाबत चर्चा केली. त्यानंतर, गुरुवारी दुपारीदेखील त्यांनी आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांकडून तपासाचा आढावा घेतला. या भेटीनंतर सायंकाळी त्यांनी ही पोस्ट टाकली. 

लॉरेन्स भाई बात करनी है...
-  दुसरीकडे, सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे लॉरेन्स बिश्नोईला थेट आपल्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘हा लॉरेन्स बिश्नोईला डायरेक्ट मेसेज आहे. 
-  नमस्ते, लॉरेन्स भाई. मी असे ऐकलंय आणि पाहिलेदेखील आहे की तुम्ही जेलमधूनदेखील झूम कॉल्स करत आहात. मलाही तुमच्याशी काही बोलायचं आहे. हे कसे करता येईल, ते प्लीज मला सांगा. संपूर्ण जगात राजस्थान ही आमची आवडती जागा आहे. पूजा करण्यासाठी आम्हाला तुमच्या मंदिरात यायचे आहे. पण त्यापूर्वी तुमच्याशी झूम कॉलवरून बोलायचे आहे. 
-  हे बोलणं तुमच्याच फायद्याचे असेल याची निश्चिंती बाळगा. तुमचा मोबाइल नंबर दिलात तर खूप उपकार होतील. धन्यवाद.’ ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Web Title: I Want Justice, says Zeeshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.