गडही राखायचा आहे आणि सिंहही!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 01:18 AM2020-12-31T01:18:00+5:302020-12-31T01:18:12+5:30
कोरोना विषाणूने २०२० साली जगभर थैमान घातले. लॉकडाऊनचा आणि कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. पहिला फटका बसला तो सर्वात ...
कोरोना विषाणूने २०२० साली जगभर थैमान घातले. लॉकडाऊनचा आणि कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. पहिला फटका बसला तो सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेला. कोरोनाला हरविण्यासाठी महापालिकेने जीवाचे रान केले. बेस्टसह रेल्वेलाही असाच फटका बसला. लॉकडाऊनच्या काळात घरफोडीचे गुन्हे वाढले.
सर्व व्यवहार डिजिटल होत असल्याने सायबर विश्वही ढवळून निघाले. लॉकडाऊनच्या काळात पर्यावरण सुधारले असले तरी बंद असलेल्या कामांमुळे मुंबईतल्या पायाभूत सेवासुविधांना तब्बल नऊ महिन्यांचा विलंब होत आहे. हॉटेल इंडस्ट्री, वाहतूक क्षेत्र रसातळाला गेले. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी जग सोडले.
बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले. वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा असो वा ईडी कारवाई; अशा अनेक घटनांनी २०२० वर्ष गाजले. राजकीय क्षेत्रात तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक होत राहिली. अशा घटनांनी २०२०ला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. हा निरोप देताना नवीन वर्षात आरोग्याची काळजी घेऊन कोरोनाला संपवायचा आहे, अशी शपथच घ्यावी लागेल.