Join us

'मलाही मारण्यासाठी तेथे बोलावले होते, हा कट होता'; तेजस्वी घोसाळकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 07:34 IST

"मॉरिसने अभिषेकला ज्या कार्यक्रमाला बोलावले, त्यात मलाही घेऊन येण्यास सांगितले होते"

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मॉरिस नरोन्हा याने अभिषेकला ज्या कार्यक्रमाला बोलावले त्या कार्यक्रमात मलाही घेऊन येण्यास सांगितले होते. तसे आपणास अभिषेकनेही सांगितले होते. परंतु, आपणास उशीर झाला म्हणून माझ्या पतीने मला फोन करून दुसऱ्या कार्यक्रमास जाण्यास सांगितले. याचा अर्थ अभिषेकची हत्या झाली तेव्हा मलाही मारण्याचा कट असावा, अशी शंका अभिषेकच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी व्यक्त केली.

हत्येच्या तपासाबाबत आम्ही जमा केलेली माहिती तपास यंत्रणेला आणि पोलिस आयुक्तांना सीसीटीव्ही फुटेजसह सादर केली. परंतु पोलिसांनी आजवर सखोल तपास केलेला नाही. यासंदर्भात १२० ब कलम लावण्याची मागणी केली होती, ती मागणीही मान्य करण्यात आलेली नाही, असे तेजस्विनी घोसाळकर यांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत अभिषेक हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी घोसाळकर कुटुंबीयांनी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :अभिषेक घोसाळकरगोळीबारमुंबई