काेराेना झाल्याने तेव्हा मी गृह विलगीकरणात होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:32+5:302021-03-23T04:07:32+5:30

-गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाबाधित झाल्याने ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यानच्या काळात मी रुग्णालयात ...

I was in home detachment when Kareena was born | काेराेना झाल्याने तेव्हा मी गृह विलगीकरणात होतो

काेराेना झाल्याने तेव्हा मी गृह विलगीकरणात होतो

Next

-गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधित झाल्याने ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यानच्या काळात मी रुग्णालयात उपचार घेतले आणि नंतर गृह विलगीकरणात राहिलो, ही वस्तुस्थिती आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

माझ्या आजारपणावरूनदेखील उलटसुलट चर्चा घडवून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवला आहे. त्यामुळे खुलासा करणे मला आवश्यक वाटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ५ फेब्रुवारीला मला कोरोनो झाला. तेव्हापासून मी नागपूर येथील अलेक्सिस रुग्णालयात दाखल होतो. १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयातून गृह विलगीकरणासाठी घरी जाण्यासाठी बाहेर पडत होतो त्यावेळी रुग्णालयाच्या गेटवर पत्रकारांनी लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्यासदर्भात काही प्रश्न विचारायचे आहेत असे सांगून मला थांबवले. मी त्यांना सांगितले की, होम क्वारंटाईनसाठी मला घरी जायचे आहे आणि त्यातच मला अशक्तपणाही असल्यामुळे मी आपणाशी बोलू शकणार नाही, पण त्यांनी आग्रह धरला की, तुम्ही खुर्चीवर बसा व आम्ही तुम्हाला १०-१२ फुटांवरून प्रश्न विचारतो.

त्यानंतर रुग्णालयाच्या गेटजवळील खुर्चीवर बसून कोरोना साथ प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करत पत्रकांरांशी अल्पवेळ वार्तालाप करून मी गृह विलगीकरणासाठी गेलाे. त्यानंतर २८ फेब्रुवारीला घराबाहेर निघालो. मात्र, हा घटनाक्रम अतिरंजितपणे लोकांसमोर मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा काही घटकांचा प्रयत्न आहे. या कारस्थानाला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: I was in home detachment when Kareena was born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.