'मला VIP गेस्ट म्हणून बोलवलं होतं'; NCBच्या ताब्यात असलेल्या बड्या अभिनेत्याच्या मुलाचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 09:30 AM2021-10-03T09:30:09+5:302021-10-03T09:30:19+5:30
कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
मुंबई: मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये एका बड्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
कोकेन, चरस, एमडी, गांजा आदी मादक पदार्थ अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. एनसीबीची रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. शनिवारी रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
#WATCH | Narcotics Control Bureau (NCB) detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai yesterday
— ANI (@ANI) October 2, 2021
(Visuals from outside NCB office) pic.twitter.com/yxe2zWfFmI
सदर प्रकरणी ताब्यात घेतलेल्या लोकांची आज चौकशी होणार आहे. अद्याप कुणाला अटक केलेलं नसल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज चौकशीदरम्यान नेमकी काय माहिती समोर येतेय याकडे लक्ष लागून आहे. सोबतच त्या बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाईल का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
एनसीबी सूत्रांनी सांगितलं की, त्या बड्या अभिनेत्याच्या मुलानं चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याला व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं. त्याच्याकडून क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नव्हती. तसेच माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं, असं त्यानं म्हटलं आहे.
क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसेच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये ड्रग्ज लपवून आणलं होतं.