Join us

"बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं, त्यात मी सहभागी होतो"; अमित शाहांनी मातृभाषेचं महत्त्वही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 9:04 AM

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत, काल त्यांनी एका कार्यक्रमात मातृभाषेचं महत्त्व सांगितलं.

Amit Shah ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहमुंबई दौऱ्यावर आहेत. शाह यांनी काल एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मातृभाषेचं महत्व सांगितलं. यावेळी शाह यांनी 'मुंबईला बॉम्बे नको मुंबईच हवं या आंदोलनात मीही सहभागी झालो होतो', असंही सांगितलं. 

मनोज जरांगेंच्या भेटीबाबत संभाजीराजे छत्रपतींकडून मोठा गौप्यस्फोट; म्हणाले...

गेल्या काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा मुंबईच महत्त्व कमी करत असल्याचा आरोप केला होता. आता या आरोपाला अप्रत्यक्षरित्या उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट इतिसाहाचा दाखला दिला आहे.  अमित शाह म्हणाले, "बॉम्बे नको मुंबई हवं आहे, ही मागणी ज्यावेळी सुरू झाली. मी देखील बॉम्बे नको मुंबई हवं ही मागणी करणारा होतो.त्यावेळी मुंबई समाचारने हेडलाईन केली होती की मुंबईच हवं', असंही अमित शाह म्हणाले. 

मातृभाषेचं महत्त्व सांगताना अमित शाह म्हणाले, किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला.  जर तुम्ही हे केलं नाही तर आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धश्रम काढण्याची वेळ येईल. कारण जर घरात नातू मातृभाषेत बोलला नाही तर त्यांचं आजोबाशी नातं जोडणार कसं? आता आई वडिलांना वेळ नसतो, फक्त आजी आजोबांना वेळ असतो त्यामुळे मातृभाषा येणं गरजेचं आहे, असंही अमित शाह म्हणाले. 

"मला अल्पसंख्याक समाजाच्या विषयासाठी धडपडणाऱ्या लोकांना सांगायचं आहे, अल्पसंख्याक समाजामध्येही अल्पसंख्याक समाज आहे. तो म्हणजे पारसी समाज आहे. 

लालबागचा राजा गणपतीचे दर्शन अमित शाह घेणार

गृहमंत्री अमित शाह यांचे रविवारी संध्याकाळी मुंबईत आगमन झालं. मुंबईत लालबागचा राजा गणपतीचे दर्शन अमित शाह घेणार आहेत. त्यानंतर महायुतीच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिगृहावर जातील. त्याआधी अमित शाह यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी मातृभाषेबाबत महत्त्वाचे विधान केलं.

टॅग्स :अमित शाहमुंबई