अनिल देशमुख यांची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरुद्ध मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्याबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर मी ईडीच्या चौकशीला सामोरे जाईन, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
देशमुख यांनी व्हिडिओ जारी करून आपली भूमिका मांडली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कार्यवाही करू, ईडीच्या चौकशीला मी हजर होणार आहे. त्याचप्रमाणे, माझा मुलगा सलीलने २००६ मध्ये नवी मुंबईत खरेदी केलेला २.६७ कोटींचा भूखंड ईडीने जप्त केला आहे, त्याची किंमत ३०० कोटी असल्याचे वृत्त काही माध्यमांतून सांगितले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. मी तपास यंत्रणेला सहकार्य करत आहे.