मला कुठल्याही क्षणी अटक होईल, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला गेलेल्या NCP नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 06:57 PM2023-02-01T18:57:18+5:302023-02-01T18:57:55+5:30

ठाणे महापालिका होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे असं आव्हाडांनी म्हटलं.

I will be arrested any moment, claims NCP leader Jitendra Awhad who visited CM eknath Shinde | मला कुठल्याही क्षणी अटक होईल, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला गेलेल्या NCP नेत्याचा दावा

मला कुठल्याही क्षणी अटक होईल, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला गेलेल्या NCP नेत्याचा दावा

googlenewsNext

मुंबई - मला कुठल्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल असं काही केंद्रातील अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. निदान ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरला आहे. माझ्याविरोधात काही केसेस नाही. परंतु ही जेव्हा बातमी येते जेव्हा आश्चर्य वाटतेच असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हिंदू जनआक्रोश मोर्चे निघतायेत. तुम्हाला विधेयक आणण्यापासून कुणी रोखलंय? बेटी बेटी के तुकडे कर देंगे हे माझ्याच बहिणीला धमकी देतायेत. हिंदू धर्मातील मुलींनाच धमक्या देतायेत. ही कुठली पद्धत झाली असं त्यांनी सांगितले. 

राज्यावर ६ लाख ६६ हजार कोटींचे कर्ज 
राज्यावर सध्या ६ लाख ६६ हजार कोटींचे कर्ज असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ज्या घोषणा केल्या जातायेत त्यासाठी पैसे आहेत वाटत नाही. आर्थिक दृष्ट्या ही धोक्याची घंटा आहे. अशाच पद्धतीने राज्य कारभार चालला तर महाराष्ट्रात दिवाळखोरी होईल असा आरोप एनसीपी नेते जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर केला. 

त्याचसोबत केंद्र सरकारने जे मोफत धान्य आणि मोफत रेशन दिले आहे तेव्हा मोफत देऊन काही होत नसते तुम्ही त्या हातांना काम द्या जे काम त्यांना रेशन घरात घेऊन जाऊ शकते. मोफत देता तो पैसा तुम्ही घरून आणता का? प्रोडक्शन वाढवणारे श्रममूल्य दिले पाहिजे. दोन लाख कोटी रुपयांचे फुकट धान्य त्यामुळे बेरोजगारीचा आलेख कुठेही खाली येताना दिसत नाही. जीडीपी रेट मागच्या वर्षी आठ दाखवला होता आणि या वर्षी सहा पूर्णांक काहीतरी दाखवला आहे तो सुद्धा फुगवून दाखवलेला आहे. देश सावरणे सध्या फार आवश्यक आहे नाहीतर देशातील सर्वसामान्य लोक अडचणीत येतील असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहचले. या भेटीआधी आव्हाडांनी हा दावा केला होता. ठाणे महापालिका होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे असं आव्हाडांनी म्हटलं होते. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 
 

Web Title: I will be arrested any moment, claims NCP leader Jitendra Awhad who visited CM eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.