मुंबई : आज ईडी अधिकारी आले. त्यांना संपूर्ण सहकार्य केले. पुढेही करत राहीन. परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. अंँटिलिया स्फोटक कार प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांची संशयास्पद भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात एनआयएने अटक केलेले सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, सुनील माने व अन्य पाेलीस अधिकारी त्यांनाच रिपोर्ट करत होते. यात त्यांचाच हात आहे. सिंग यांना पदावरून हटविल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले. ते आरोप आधी का केले नाही. एनआयएच्या तपासात सत्य समोर येईलच. माझ्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ईडीच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
...............................