Join us

'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 20:56 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज शिवाजी पार्क येथे झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी आहे, असं सूचक विधान करत विकसित भारताचा रोडमॅप मतदारांसमोर मांडला. 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज शिवाजी पार्क येथे झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी आहे, असं सूचक विधान करत विकसित भारताचा रोडमॅप मतदारांसमोर मांडला. 

नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, मुंबईमध्ये पुढच्या काळात रेकॉर्डब्रेक गुंतवणूक येणार आहे. येत्या काही वर्षांतच जेव्हा मी तुमच्यामध्ये येईन, तेव्हा आपण जगातीत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनलेले असू, ही माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला गॅरंटी देण्यासाठी आणि तुमच्या मुलांना विश्वास देण्यासाठी आलो आहे की, मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन. त्यामुळे नरेंद्र मोदी २४ बाय ७, २०४७ च्या मंत्रासह काम करत आहे, असे मोदी म्हणाले. 

यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसने २०१४ मध्ये सत्ता सोडली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. मात्र आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला पाचव्या क्रमांकावर आणलं आहे. काँग्रेसचे पंतप्रधान आपल्या भाषणांमधून गरीब गरीब असा मंत्र जपायचे. मात्र आम्ही २५ कोटी भारतीयांना दारिद्र रेषेतून वर आणले आहे, असेही मोदींनी यावेळी सांगिलते. 

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४नरेंद्र मोदीमुंबईलोकसभा निवडणूक २०२४